वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणांतर्गत शालार्थमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविणेबाबत varshitha vetan shreni training
संदर्भ :- संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून प्राप्त शालार्थ API नुसार
उपरोक्त संदर्भाकित विषयात नमूद केल्यानुसार आपल्या कार्यालयाकडून दि.११/०३/२०२५ रोजी शालार्थ API प्राप्त झालेला आहे. या डेटाची तपासणी केली असता शिक्षकांची माहिती (उदा. मराठीतून नाव, Email ID) अपूर्ण असल्याचे निर्देशास आले आहे. तसेच काही शिक्षकांचे मोबाईल नंबर, शाळा यात बदल झालेला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही माहिती शालार्थमध्ये update होणे गरजेचे आहे.
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. ज्या शिक्षकांना शालार्थ आयडी प्राप्त आहे. अशा शिक्षकांची शालार्थ मधील माहिती वरिष्ठ व निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास ती update करणेबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.