शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचा-यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे shalarth pranali 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचा-यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे shalarth pranali 

संदर्भः मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र.राशेसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (एसबीटीई) २०२५-२६/०१४८२ दि. १५/०३/२०२५.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षकांच्या वरिष्ठ निवडश्रेणी प्रशिक्षणाकरीता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे. तथापि, शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की, मोबाईल नं., ई-मेल आयडी, शाळेचे नाव, पत्ता, इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदविलेल्या नाहीत.

करीता आपणांस सूचित करण्यात येते की, आपले जिल्हयातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी दिनांक ३१/०३/२०२५ रोजीपर्यंत अद्यावत (Update) करणेबाबत मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. तसेच सदरील नोंदी शाळास्तरावरुन अद्ययावत झाल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक, वेतन व भनिनि पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य (Approve) कराव्यात. करीता सदरील कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे.

(मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.)

(

Join Now