उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम (ULLAS NBSK) अंतर्गत 23 मार्च 2025 रोजी घेण्यात येणा-या मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन (FLN) चाचणीबाबत 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम (ULLAS NBSK) अंतर्गत 23 मार्च 2025 रोजी घेण्यात येणा-या मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन (FLN) चाचणीबाबत

संदर्भ :- शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र जा. क, F. No. 6-1/2023-AE-2 दि. 18 फेब्रुवारी, 2025.

उपरोक्त संदर्भिय विषयानुसार उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (ULLAS NBSK) च्या अंतर्गत रविवार दि. 23 मार्च 2025 रोजी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) चे संपूर्ण राज्यात आयोजन करण्यात येणार आहे. असाक्षर नोंदणी उद्दिष्ट संख्या, असाक्षर परीक्षा नोंदणी फॉर्म व परीक्षा आयोजनासाठीच्या मार्गदर्शक सूचना सोबत देण्यात येत आहेत. राज्य साक्षरता केंद्र, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे प्रश्नपत्रिका भाषांतरित करण्याचे काम करीत आहे. सर्व भाषेतील सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणे, FLNAT परीक्षा 2025 पार पडल्यानंतर निकाल संकलन, निकाल त्रुटी दुरुस्ती, समाज माध्यमांमध्ये आवश्यक त्यावेळी प्रसिद्धी व इतर अनुषंगिक कामे पार पाडण्याची जबाबदारी राज्य साक्षरता केंद्राची असेल,

तरी आपण आपल्या जिल्हयातील मा. अध्यक्ष जिल्हा नियामक परिषद व मा. अध्यक्ष जिल्हा कार्यकारी समिती, उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम यांच्याशी समन्वय साधून मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) आयोजन मार्गदर्शक सूचना पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे मार्गदर्शक सूचनांनुसार सुरळीतपणे पार पडण्यासाठी अचूक नियोजन करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करावा.

सोबत – 1. FLNAT चाचणीस प्रविष्ट होणारी असाक्षर संख्या

(असाक्षर नोंदणी उद्दिष्ट संख्या 17 मार्च, 2024 मधील आवश्यक सुधारणा [Need improvement ] शेरा प्राप्त असाक्षर)

2. परीक्षा आयोजन मार्गदर्शक सूचना पुस्तिका व परीक्षा नोंदणी अर्ज / प्रपत्र (रजिस्ट्रेशन फॉर्म)

3. उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत बाबनिहाय खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना (कमाल रु. 165/- निकषानुसार मात्र केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या अधिन राहून)

Join Now