शिक्षक भरती करीता अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन tait online exam ayojan
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०१
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन माहे मे व जून २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी.