EMI चे गणित समजुन घ्या.. तुम्हाला कोणीही सांगणार नाही equated monthly instalment
1. घराचा EMI तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 30-40% पेक्षा जास्त नसावा
2. गाडीचा EMI तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 10-15% च्या आत ठेवावा
3. व्यक्तिगत कर्जाचा EMI 10% पेक्षा जास्त असेल तर आर्थिक ताण वाढू शकतो
4. सर्व मिळून एकूण EMI मासिक उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त जाऊ नये
5. फक्त क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी EMI घेतला तर तो तुमचं बजेट बिघडवू शकतो
6. मोबाईल किंवा गॅझेट EMI टाळा कारण ते गुंतवणूक नाहीत depreciating assets आहेत
7. घराचे कर्ज घेताना फक्त EMI नाही तर त्यासोबतच्या अतिरिक्त खर्चाचा विचार करा
8. गाडीचे कर्ज घेताना डाउन पेमेंट जास्त द्या म्हणजे EMI आणि व्याज कमी राहील
9. लहान EMI पेक्षा मोठी डाउन पेमेंट फायदेशीर असते कारण व्याज कमी लागतं
10. घर आणि कार दोन्हीचे EMI एकत्र करून उत्पन्नाच्या 50% ओलांडत असतील तर आर्थिक ताण येऊ शकतो
11. फर्निचर आणि इतर लहान गोष्टींसाठी कधीही EMI घेऊ नका त्या रोख पैशात घेणं चांगलं
12. EMI हा तुमच्या कमाईचा एक भाग खाऊ शकतो त्यामुळे नेहमी फक्त आवश्यकतेपुरताच घ्या
13. EMI घेताना केवळ महिन्याच्या हप्त्याचा विचार करू नका, एकूण व्याज आणि मुदत पाहा
14. गृहकर्ज लवकर फेडू शकलात तर करा कारण व्याज खूप मोठी रक्कम खाते
15. सर्व EMI चालू असताना emergency fund तयार ठेवा अन्यथा संकटात पडाल
16. लहान EMI आकर्षक वाटतात पण ते लांब काळासाठी खिशाला मोठा फटका देतात
17. एका वेळी जास्त EMI असतील तर तुमची गुंतवणूक क्षमता कमी होते
18. कोणत्याही EMI चा कालावधी जितका कमी तितका चांगला कारण व्याज वाचतं
19. फक्त सवलतीसाठी EMI घेऊ नका, त्या वस्तूची गरज आहे का हे पहा
20. जर EMI सोडून तुमच्याकडे बचत किंवा गुंतवणुकीसाठी पैसे राहत नसतील तर आर्थिक गणित चुकतंय याची जाणीव ठेवा