इयत्ता १० वी व १२ वी परिक्षेत परीक्षेत वाढीव क्रीडा गुण सवलत मिळण्यासाठी सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत sports marks savalat paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता १० वी व १२ वी परिक्षेत परीक्षेत वाढीव क्रीडा गुण सवलत मिळण्यासाठी सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत sports marks savalat paripatrak 

संदर्भ: १. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि/२०१५/प्र.क्र.२६२/एस.डी.२, दि.२० डिसेंबर, २०१८.

२. शासन शुद्धीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि-एस.डी.२, दि.२५ जानेवारी, २०१९.

३. सचिव, राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांचे प्रकटन दि. ०६.०२.२०२५.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने संदर्भिय क्र. १ व २ अन्वये निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धेतील पात्र खेळाडूंना क्रीडा गुण सवलत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते.

सन २०२४-२५ पासून क्रीडागुण सवलतीचे अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्याबाबत दि. १४ जानेवारी २०२५ रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभरात आपले सरकार प्रणालीद्वारे अर्ज स्विकारण्यात येत आहेत.

यावर्षी इयत्ता १० वी व १२ वी परिक्षांचा निकाल दि. १५ मे २०२५ पूर्वी जाहीर करण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा मानस असल्याने, क्रीडागुण सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने दि. १५ एप्रिल २०२५ पूर्वी विभागीय शिक्षण मंडळांना पाठविण्याबाबतचे प्रकटन संदर्भ ३ नुसार कळविण्यात आले आहे.

शासन निर्णयामधील तरतुदीनुसार, क्रीडागुण सवलत अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा याकरीता केवळ दि. ११ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारावेत. याबाबतची व्यापक प्रसिध्दीद्वारे आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे

(मा.आयुक्त महोदयांच्या मान्यतेने)

Join Now