इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या पाच मुली नशेच्या अजगरी विळख्यात ; व्यसनमुक्ती केंद्रात दाखल english convent school 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या पाच मुली नशेच्या अजगरी विळख्यात ; व्यसनमुक्ती केंद्रात दाखल english convent school

पालकांनी दामिनीच्या मदतीने एकीला केले व्यसनमुक्ती केंद्रात दाखल शाळकरी मुलांना हेरून नशेच्या जाळ्यात ओढणारी टोळी सक्रिय

छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक वास्तव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील

नशेखोरीचे अतिशय धक्कादायक अंग समोर आल्याने पालकवर्ग तसेच शैक्षणिक वर्तुळाला जबर हादरा बसला आहे. उच्चभ्रू वस्तीमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील अवघ्या १४ ते १६ वयाच्या पाच मुली सिगारेट, गांजा, दारूसारख्या गंभीर नशेच्या अजगरी विळख्यात अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दामिनी पथकाने यापैकी एका मुलीला ताब्यात घेऊन तिची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. दरम्यान, शाळकरी मुलांना हेरून नशेच्या जाळ्यात ओढणारी टोळीच सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

नशेखोरीमुळे गुन्हेगारी वाढत असल्याची ओरड नेहमी होते. अशातच जालना रोडवर एका नामांकित शाळेतील काही मुलींना परिसरातील टवाळखोर मुलांनी नशेच्या गर्तेत

ओढल्याचे आढळून आले. प्राप्त माहितीनुसार, १४ वर्षीय स्नेहा (नाव काल्पनिक) जालना रोडवरील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ८ वीमध्ये शिकते. तिचे वडील दारूच्या आहारी गेले आहेत. आई धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते.

स्नेहा चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहील, अशी अपेक्षा तिच्या आईला आहे. त्यातून त्यांनी परिस्थिती नसतानाही तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले. मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून स्नेहा काही वाईट मित्र-मैत्रिणींच्या पान ७ वर

नशेत पालकांनाही केली मारहाण

प्राप्त माहितीनुसार या मुली नशा करीत असल्याने पालकही त्रस्त आहेत. दुपारी १२ वाजता घराबाहेर पडलेली ही अल्पवयीन मुले, मुली थेट मध्यरात्री घरी परतात. त्रस्त पालकांनी दामिनी पथकाच्या मदतीने एकीला खासगी रुग्णालयातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले आहे. पैकी स्नेहा ही नशेत आईवडिलांनाही मारहाण करत होती. तसेच अन्य नातेवाइकांनाही तिने अरेरावी करत चावा घेतल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली आहे.

Join Now