आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जेष्ठता विद्यमान जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष रुजु झाल्याच्या दिनांकापासुन गणण्याबाबत inter district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जेष्ठता विद्यमान जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष रुजु झाल्याच्या दिनांकापासुन गणण्याबाबत inter district transfer 

संदर्भ :-

१) शासन निर्णय क्रं. जिपब/४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४/दि. ०७.०४.२०२४

२) शासनाची समक्रमांकाची दि.२५.०३.२०२२ व दि. ०२.०५.२०२२ रोजीचे पत्रे

३) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रं. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१७५/आस्था-१४/दिनांक २५ जुलै २०२२.

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते. की जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसाठी दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत धोरण विहीत करण्यात आलेले आहे. बदलीसाठी सेवाजेष्ठता सदर दि. ०७.०४.२०२१ चे शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ४.५.१ नुसार निश्चीत करणेत आलेली आहे.

तथापी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याबाबत दि. ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रं. ४.५.१. मधील जिल्हा परिषदेतील एकुण सेवा हा शब्दप्रयोग विद्यमान जिल्हा परिषदेतील सेवा असा विचारात घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जेष्ठता विद्यमान जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष रुजू झाल्याच्या दिनांकापासून गणण्यात यावी असे संदर्भ क्रमांक ३ चे पत्रामध्ये नमुद केलेले आहे त्यानुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी उपरोक्त नमूद सुचनांची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी. याबाबत अनियमितता अथवा हलगर्जीपणा झालेस आपणास सर्वस्वी जबाबदार धरणेत येईल याची नोंद घ्यावी.

Join Now