YCMOU सर्व शिक्षणक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी (Repeater) विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याबाबत ycmou application start 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

YCMOU सर्व शिक्षणक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी (Repeater) विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याबाबत ycmou application start 

सूचनापत्र 01 / मे / जून 2025 दिनांक : 10/03/2025 सर्व शिक्षणक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी (Repeater) विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याबाबत

सर्व शिक्षणक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक येथे पहा Click here 

1) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 उन्हाळी (वार्षिक/सत्रनिहाय) परीक्षाअंदाजे दिनांक 15 मे 2025 पासून आयोजित करण्याचे नियोजित आहे. सर्व शिक्षणक्रमांच्या परीक्षांची वेळापत्रके ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावरएप्रिल 2025 च्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होतील. या परीक्षेसाठी उपलब्ध शिक्षणक्रमांचा तपशील सोबत जोडला आहे. तेवढ्याच शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे आयोजन केले जाईल.

2) 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व पुनर्परीक्षार्थीनी संबंधित शिक्षणक्रमांच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज मुदतीत खालील दिलेल्या लिंकवर सादर करावा.

(https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamv2 ExamformSubmission PpAmAtWise.aspx)

परीक्षा शुल्क जेवढे विषय अनुत्तीर्ण आहेत त्या सर्वांचे भरावे लागेल परीक्षा अर्ज व शुल्क प्रत्येक अनुत्तीर्ण सेमिस्टर/वर्षासाठी भरावे लागेल. ऑनलाईन परीक्षा अर्ज भरतांना परीक्षा शुल्क हे ऑनलाईनच भरायचे आहे. (डी.डी /RTGS/NEFT रोख स्वीकारले जाणार नाही).

4) बी.ए./बी. कॉम शिक्षणक्रमांच्याज्या विद्यार्थ्यांचा प्रवेशानंतरचा विहीत नोंदणी कालावधी 8 वर्षांचा पूर्ण झाला आहे, त्या विद्यार्थ्यांची नोंदणी संपुष्टात आली आहे. अशा विद्यार्थ्यांनीBA/ B.Com, शिक्षणक्रमाच्या पुर्ननोंदणीसाठी विद्यापीठाच्याहोम पेज वर Re-registration (BA/B.Com) या टॅबवर Chttps://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1412) लॉग इन करून पुर्ननोंदणी शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करावी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 दिवस लागतील. त्यानंतर परीक्षा अर्ज भरता येईल.

5) तसेच इतर शिक्षणक्रमांच्याही (कृषि शिक्षणक्रम वगळून) विद्यार्थ्यांचा नोंदणीचा विहित कालावधी उदा. 5 वर्ष किंवा माहितीपुस्तिकेतील नियमानुसार संपलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणक्रमांच्या नियमांच्या अधीन राहून प्रथम पुर्ननोंदणी (Re-registration) केल्यानंतरच ऑनलाईन परीक्षा अर्ज भरावा. बी.ए./बी. कॉमशिक्षणक्रम वगळता इतर शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पुर्ननोंदणी शुल्क हे माहितीपुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार एकूण शिक्षणक्रम शुल्काच्या 50% परीक्षा शुल्क भरावे आणि ऑफलाईन परीक्षा अर्ज शुल्क भरल्याची पावती जोडून Speed Post ने Controller of Examinations, Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Near Gangapur Dam, Govardhan, Nashik 422222 या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावी. या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन भरता येणार नाही.

6) सर्व कृषी शिक्षणक्रमांसाठी नोंदणी कालावधी हा प्रवेश घेतल्यापासून तीन वर्षासाठी वैध राहील. कृषी शिक्षणक्रमासाठी पुर्ननोंदणी करता येत नाही. नोंदणी कालावधीसंपल्यानंतर नव्याने प्रवेश घ्यावा.

7) 9 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून 14 वर्ष होऊन गेल्याने त्यांचा नोंदणी कालावधी संपलेला असल्याने परीक्षा देता येणार नाही. 9 अंकी कायम नोंदणी क्रमांकाच्या कुठल्याही वर्षाचा परीक्षा अर्ज यापुढे ऑफलाईन स्वीकारला जाणार नाही. या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने प्रवेश (नवीन नोंदणी करून) घेणे अनिवार्य आहे.

8) विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र (हॉलतिकीट) पोर्टलला ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. विद्यार्थ्यांनी ते HALL TICKET LINKवरून डाऊनलोड करून घ्यावे. विद्यार्थ्यांसहॉल तिकिट स्वतंत्रपणे पाठविले जाणार नाही.

१) प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी, वेळापत्रकासाठी, वेळापत्रकातील होणाऱ्या संभाव्यबदलाबाबत विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी पहावे. परीक्षेसंबंधी सर्व माहिती पोर्टलवर प्रसिध्द केली जाईल. अभ्यासकेंद्रे अथवा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही.

10) सर्व शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी प्रवेश घेतलेल्या शिक्षणक्रमांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने गृहपाठ (Home Assignment) /Project Work) इ. बाबी अभ्यासकेंद्राशी संपर्क साधून लेखी परीक्षेपूर्वी विहित वेळेत ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने पूर्ण कराव्यात. ज्या शिक्षणक्रमांना ऑनलाईनगृहपाठ (Home Assignment) सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण निकालात विचारात घेतले जातात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत जागरूक राहून वेळेत पूर्तता करावी. सदर सूचना ही फक्त शिक्षणक्रमनिहाय पुनर्परीक्षार्थी अभ्यासक्रमामध्ये अनुत्तीर्ण विद्याथ्यांनी गृहपाठ (Home Assignment) है पुन्हा सादर करावे असे माहितीपुस्तिका किंवा अभ्यासक्रमामध्ये नमूद असेल त्यांनाच लागू राहील

11) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत येणाऱ्या M48, M49, M50, M58, M59, M60, M83, M117, V151, V152,V153, V154, V155, V156, या शिक्षणक्रमांच्या प्रथम / द्वितीय तृतीय सत्रातील क्षेत्रीय कार्य & प्रकल्प (Field Work & Project)/On Job Training ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले नसेल किंवा अनुत्तीर्ण

असलेल्या विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षार्थी परीक्षा अर्ज भरणे बंधनकारक असेल, क्षेत्रीय कार्य & प्रकल्प / On Job Training पूर्ण करणे अनिवार्य आहे.

12) ज्या शिक्षणक्रमांच्या अंतर्गत गुणांची संगणकीय नोंद करून केंद्राच्या लॉगीनमार्फत (Manually) गुण भरायचे आहेत व डाटा पब्लिश करायचा आहे, त्यांनी ही कामे विहित वेळेत अचूक नोंदी करून पूर्ण करावी न झाल्यात त्याची संपूर्ण जबाबदारी अभ्यासकेंद्राची राहील गुणांची संगणकीय नोंद कशी करावी याबाबतच्या माहितीसाठी खालील सादरीकरणासाच्या (PPT) लिंकवर क्लिक करावे.

(https://ycmou.digitaluniversity.ac/WebFiles/MarkEntryProcessPPTD.pdf)

13) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडीटचा आयडी (ABC ID) तयार करणे अनिवार्य असून हा ABC ID तयार करण्याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1420 या लिंकवर ही माहिती उपलब्ध असून सर्व विद्यार्थ्यांनी ABC ID तयार करून आपल्या अभ्यासकेंद्रास तो कळविणे आवश्यक आहे.

सर्व परीक्षार्थी विद्यार्थी, अभ्यासकेंद्रे आणि विभागीय केंद्रे यांनी वरील सूचनांची नोंद घ्यावी, विभागीय केंद्र यांनी वरील सर्व बाबी आपल्याशी संलग्नित सर्व अभ्यासकेंद्राना आपल्या स्तरावरून कळविण्यात याव्यात.

Join Now