सुधारीत प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवालानुसार शाळा तपासणी व अहवाल भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना varshik tapasni report 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुधारीत प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवालानुसार शाळा तपासणी व अहवाल भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना varshik tapasni report 

उपरोक्त विषयान्वये संदर्भ पत्र १ अन्वये परिषदेने तयार केलेल्या सुधारीत वार्षिक तपासणी अहवालानुसारच सन मध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळातील इ. १ली ते ८वी च्या वर्गाची वार्षिक तपासणी करण्यात यावी व त्यादृष्टीने आपल्या स्तरावरुन सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) यांना आपल्या स्तरावरुन योग्य ते आदेश निर्गमित करण्याबाबत कळविण्यात आले होते.

संदर्भ २ च्या पत्रान्वये राज्यस्वरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात प्रार्थांमक शाळा वार्षिक तपासणी अहवालाच्या चाचणीप्रतीवर सविस्तर गटवर्या करुन क्षेत्रिय अधिकान्यांचं अभिप्राय घेण्यात आले होते. संबंधितांच्या अभिप्रायांचा विचार करुन प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवाल अंतिम करण्यात आला आहे.

संदर्भ ३ च्या पत्रान्वये सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य.) यांना सोबत जोडलेल्या प्रार्धामक शाळा वार्षिक तपासणी अहवालाची प्रत (pdf. फाईल) देवून तपासणी अधिका-यांचे प्रशिक्षण आयोजित करणेबाबत कळविण्यात आले होते.

या शैक्षणिक वर्षापासून इ.१ली ते ८वी चे वर्ग असणा-या प्रार्थामक / माध्यमिक शाळांच्या वार्षिक नपासणीसाठी मोबत दिलेल्या प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवालानुसारच सर्व शाळांची तपासणी करावी. याबाबत आपल्या स्तरावरुन आपल्या अधिनस्थ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश निर्गमित व्हावेत ही विनंती.

अहवाल भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना

भाग १

शाळेची तपासणी करण्यापूर्वी शाळेला किमान १५ दिवस आधी भेट देऊन मुख्याध्यापकाने भरावयाचा भाग १ भरण्याबाबत तसेच तपासणीच्या दृष्टीने माझी समृद्ध शाळा, UDISE रजिस्टर भरणेबाबत आवश्यक सूचना तपासणी अधिकाऱ्याने दवाव्यात.

प्रत्येक तुकडीचा एकूण पट, तपासणीच्या दिवशी असणारा पट व मागील महिन्याची सरासरी उपस्थिती नोंदवावी.

वंचित-दुर्बल घटकातील बालकांचे RTE कायद्यातील तरतुदीनुसार किमान २५% प्रवेश झाल्याची स्वतंत्र नोंदवही ठेवावी व ती तपासणीच्या वेळी सादर करावी.

समाज सहमाग याअंतर्गत विविध समित्यांचे गठण व समिती सभांचे इतिवृत्त रजिस्टर इ. अभिलेखे तपासणीच्या वेळी सादर करावेत.

नियुक्तीस वैयक्तिक मान्यता असणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती नोंदवावी.

मागील सत्राच्या मूल्यमापनाचा तपशील भरताना एका वर्गाच्या एकापेक्षा अधिक तुकड्धा असतील तर त्या सर्व तुकडघांतील विद्यार्थी संख्या एकत्रित करून तपशील भरावा.

भाग – २

शिक्षक कार्यतपासणीसाठी गरजेनुरूप शिक्षक संख्येप्रमाणे स्वतंत्र पृष्ठे वापरावीत. यामध्ये शिक्षकांनी केलेले वर्ग/विषयासाठी आवश्यक नियोजन-जसे मासिक नियोजन, दैनिक नियोजन, दैनंदिन निरीक्षणात्मक नोंदी, मूल्यमापन अभिलेखे, शैक्षणिक साहित्य, सहशालेय उपक्रमांचे नियोजन पाहावे प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे निरीक्षण करून, विविध अध्ययन अनुभव देऊन केलेले अध्यापन व आकारिक मूल्यमापन साधनतंत्रे यांच्या अनुषंगाने अभिप्राय दयावेत

तपासणी अधिकाऱ्याने तपासणीपूर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रकाशित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन भाग-१,२,३ त्याचबरोबर ‘माझी समृद्ध शाळा’ पुस्तिका, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालस्नेही शिक्षण, वयानुरूप मुलांचे विशेष प्रशिक्षण या पुस्तिका अभ्यासाव्यात.

एका शिक्षकाचे एका विषयाचे प्रत्यक्ष अध्यापन पाहावे, तसेच संबंधित वर्गाच्या विद्यार्थ्यांचा अन्य विषयांबाबत प्रतिसाद तपासावा व विषयनिहाय प्रतिसादाबाबत अभिप्राय दद्यावेत.

विद्यार्थ्यांचा विषयनिहाय प्रतिसाद नोंदवत असताना त्या त्या विषयांच्या मूलभूत क्षमतांवर आधारित प्रश्न विचारावेत व त्याबाबत विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद विचारात घेऊन अभिप्राय लिहावा.

आकारिक मूल्यमापन नोंदवही, दैनिक टाचण यही, विद्यार्थी संचिका, दैनंदिन निरीक्षणात्मक नोंदी या बाबी पाहून खात्री करून अभिप्राय दयावेत.

शिक्षक संचिका (Teacher Portfolio) यात शिक्षकाने केलेले नवोपक्रम, घेतलेली विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा सहभाग, मिळालेले पुरस्कार, स्वतंत्र लिखाण, स्वतः केलेले शैक्षणिक साहित्य इत्यादी बाबी असाव्यात.

शाळेतील उल्लेखनीय बाबी यामध्ये शाळेने स्पर्धा परीक्षेत (शिष्यवृत्ती, नवोदय, NTS, STS, NMMS, चित्रकला ग्रेड परीक्षा) आणि क्रीडा व सहशालेय स्पर्धांमध्ये मिळविलेले यश, स्काऊट गाईड, कब/बुलबुल, मीना राजू मंच यांसारखे उपक्रम, समाजोपयोगी उपक्रम या बाबींचीही नोंद घ्यावी.

विशेष शिक्षण म्हणून वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेशित मुलांच्या प्रभावी अध्ययनासाठी शाळेचे प्रयत्न. जसे :- सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांचा सहभाग, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणून शाळेचे प्रयत्न या संबंधी अभिप्राय नोंदवावा.

शासनाच्या विविध योजनांचे लाम मुलांना मिळाले का याची खात्री अभिलेखे पाहून करावी व अभिप्राय नोंदवावा.

मार्गदर्शक सूचना नोंदवताना आर्थिक अभिलेखे व सर्वसामान्य अभिलेखे हे काळजीपूर्वक पाहावेत. त्यातील त्रुटी अभिलेखाचे नाव व पृष्ठ क्रमांक या स्वरूपात नोंदवाव्यात.

ई-लर्निंगबाबत सूचना करताना दैनंदिन अध्ययन-अध्यापनात संगणक, इंटरनेट यांचा वापर व मुलांना संगणक शिकण्याची सुविधा या बाबी विचारात घ्याव्यात.

यापूर्वी तपासणीच्या वेळी दिलेल्या सूचनांचे अनुपालन व झालेली प्रगती यासंबंधी अभिप्राय नोंदवावेत.

शाळेबाबत एकंदरित सर्वसाधारण अभिप्राय लिहावा.

प्राथमिक/माध्यमिक शाळांतील इ. पहिली ते आठवीच्या वर्ग अध्यापनाची तपासणी या अहवालानुसार करण्यात यावी.

शाळा तपासणी पूर्ण झाल्यानंतर शिक्षक सहविचार सभा आयोजित करून मार्गदर्शन करावे.

Join Now