या कर्मचा-यांच्या महागाई भत्ता व घरभाडे भत्ता फरक देयकाबाबत hra dearness allowance 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या कर्मचा-यांच्या महागाई भत्ता व घरभाडे भत्ता फरक देयकाबाबत hra dearness allowance 

दि.०१.०७.२०२४ ते ३१.०१.२०२५ या कालावधीतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या महागाई भत्ता व घरभाडे भत्ता फरक देयकाबाबत

दि.०१.०७.२०२४ ते ३१.०१.२०२५ या कालावधीतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या महागाई भत्ता व घरभाडे भत्ता फरक देयकाबाबत….

संदर्भ :- मा. शासन, शालेय शिक्षण विभाग यांचेकडील पत्र क्र. संकीर्ण १३२४/प्रक्र३४/सेवा-९, दि. २५.०२.२०२५

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, दि.०१.०७.२०२४ ते ३१.०९.२०२५ या कालावधीतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या महागाई भत्ता व घरभाडे भत्ता फरक देयक शालार्थ २.० मधुन फॉरवर्ड करुन दि. ११.०३.२०२५ पर्यंतच या कार्यालयात सादर अप्रूव्ह करुन करण्यात यावी. यानंतर सदर देयके स्वाकारली जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

देयकासंदर्भातील महत्वाच्या सुचना

१. महागाई भत्ता व घरभाडे भत्ता कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या दिनांका पर्यंतच आकारण्यात यावा. व त्याप्रमाणे तक्ते जोडण्यात यावे.

२. पी.पी.ओ. ची छायांकीत प्रत जोडण्यात यावी.

३. सदर देयक १ प्रतीमध्ये मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरी व शिक्यासह सादर करण्यात यावे.

४. सदर देयकावर सेवानिवृत्त कर्मचारी बँकखाते क्रमांक, शाळेचा बँकखाते क्रमांक, शाखा क्रमांक व शालार्थ आय.डी. कव्हरींग लेटरवर ठळक नमुद करण्यात यावे.

५. महागाई भत्ता व घरभाडे भत्ता फरक देयकाबाबत करण्यासंबंधी दिलेल्या माहिती प्रमाणे कार्यवाही करावी. देयक काळजीपुर्वक तयार करुन तपासुन प्रस्तुत कार्यालयास सादर करावे

Join Now