राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक शाळांना अनुदान मंजूर करणे granted school anudan manjur

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक शाळांना अनुदान मंजूर करणे granted school anudan manjur 

शासन निर्णय दिनांक १४/१०/२०२४ च्या अंमलबजावणीचाबत. कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त) राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक शाळांना अनुदान मंजूर करणे.

संदर्भ : शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२०९/एसएम-४, दि. २४/०२/२०२५.

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भाधीन शासन पत्राचे अवलोकन व्हावे.

मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक १०/१०/२०२४ रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, यापूर्वी अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव टप्पा, त्रुटी पुर्तता केलेल्या शाळा, अघोषित शाळा/तुकड्या तसेच सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकडया ना दिनांक ०१ जून, २०२४ पासून अनुदान मंजूर करण्यात आले असून, अनुदान पात्र ठरत असलेल्या शाळा/तुकडया व शिक्षक/शिक्षकेतर पर्दाना, प्रत्यक्ष अनुदानासाठी विहित अटी व शतीनुसार तपासणीच्या अधीन राहून अनुदान मंजूर करण्याचे निर्देश आहेत.

शासन निर्णय दिनांक १४/१०/२०२४ च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने संदर्भातील शासन पत्रामध्ये नमूद केलेल्या मुद्या क्रमांक १ ते ८ मध्ये नमूद मुद्यांची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दिनांक १०/०३/२०२५ पर्यंत समक्ष उपस्थित राहून सादर करावी. तसेच शासन निर्णय दिनांक १४/१०/२०२४ मधील प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे. (सॉफ्ट कॉपी DV-TTSurekh या फॉटमध्ये सादर करावी)

Join Now