शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०१७ नुसार पदभरती अंतर्गत मा.उच्च न्यायालयाचे आदेशानुसार कार्यवाही अनुसरण्याबाबत pavitra portal shikshak bharti
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०१७ नुसार पदभरती अंतर्गत याचिका क्रमांक १४७१८/२०२३ संतोष वसंत चव्हाण व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचे दिनांक २७.०२.२०२५ चे आदेशानुसार कार्यवाही अनुसरण्याबाबत.
संदर्भ : १. पवित्र पोर्टलवर पसिद्ध शिफारस यादी दि. २९.११.२०२३, ३०.११.२०२३
२. उक्त याचिका प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश दि.०५.१२.२०२३
३. या कार्यालयाचे आपणांस पत्र जा.क्र.७७०२, दि.१३.१२.२०२३
४. उक्त याचिका प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश दि.२७..०२.२०२५
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०१७ नुसार पदभरती अंतर्गत दि.२९.११.२०२३ व ३०.११.२०२३ रोजी उमेदवरांची गुणवत्तेनुसार नियुक्तीसाठी शिफारसयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर याचिका क्र.१४७१८/२०२३ मधील मा. न्यायालयाने दि.०५.१२.२०२३ रोजीचे आदेशान्वये उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करु नयेत असे निर्देश प्राप्त झाले होते.
सद्यस्थितीत मा. न्यायालयाचे दि.२७.०२.२०२५ रोजीचे आदेशान्वये उमेदवारांच्या नियुक्तीस देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. (सोबत मा. न्यायालयाचे आदेशाची प्रत संलग्न.) कृपया अवलोकन व्हावे. मा. न्यायालयाचे आदेशामध्ये नमूद केल्यानुसार सदर ३३२ उमेदवारांना मा. न्यायालयाचे याचिकांतील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात यावी.
त्यानुसार नियुक्तीसाठी कागदपत्र पडताळणीमध्ये यथानियम पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेशामध्ये शीर्षकात योग्य फॉन्ट आकारात आणि ठळक अक्षरात विशेषतः नमूद करावे की “सदर नियुक्ती ही, मा. न्यायालयातील याचिका क्र.१४७१८/२०२३ व इतर संलग्न याचिकांतील निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे.”
तरी, पवित्र पोर्टलवरील शिफारस यादीतील ३३२ उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मा. न्यायालयाचे उपरोक्त ओदशान्वये पुढील आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अवगत करावे.
(मा. आयुक्त शिक्षण यांचे मान्यतेनुसार)