दि.13 मार्च, 2025 पासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळ सत्रात भरविणेबाबत school timetable in summer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.13 मार्च, 2025 पासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळ सत्रात भरविणेबाबत school timetable in summer 

संदर्भ विविध शिक्षक संघटना, बुलढाणा जिल्हा यांची मागणी,

उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने सूचीत करण्यात येते की, विदर्भात उन्हाळी तापमानात वाढ झालो असुन, ग्रामीण भागात पाण्याची कमतरता निर्माण होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थाचे आरोग्य हित लक्षात घेता, जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी होत असून, त्या अनुषंगाने दि. १३ मार्च २०२५ पासून शैक्षणिक सत्र संपेपर्यंत जिल्हयातील जि.प. व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कुल सकाळच्या सत्रात ७.०० ते ११.३० या वेळेत भरविण्यात

याव्यात.

वरील वेळेनुसार शाळा भरविण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना कळविण्यात यावे. तथापि, पुर्णवेळ शाळेप्रमाणे सर्व तासिका होतील व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील अध्यापनाच्या तासाच्या तरतुदीचा भंग होणार नाही तसेच निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंमजबजावणीमध्ये अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी.

यांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई झाल्यास, याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांचेवर निश्चित करण्यात येईल याची नोंद घेवून, गटशिक्षणाधिकारी सर्व यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना अवगत करावे.

Join Now