८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त 500 शब्दात मराठी भाषण / निबंध international women’s day
कोमल है तू, कमजोर नहीं तू, शक्ति का नाम नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है’ असं ज्या स्त्रीचं वर्णन केले जातं त्याच खीचा गौरव करण्यासाठी दरवीं ८ मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात येतो. ८ मार्च रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला हक्क बळवळीतील केंद्रबिंदू म्हणून पाळला जातो हा दिवस लिंगसमानता, महिलांवरील अत्याचार आणि हिंसा वारसारख्या मुद्यांबर लक्ष केंद्रित करतो.
विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत संपूर्ण जगभराच्या स्त्रीयांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील वी-पुरुष विषमतेचे हे एक कळीत उदाहरण, या अन्यायाविरुद्ध रिश्या आपापल्या परीने संघर्ष करत होत्या. १८९० मध्ये अमेरिकत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सोजिष्ट असोसिएशन स्थापन झाली. परंतु ही असोसिएशन सुध्दा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. १९०७ साली अमेरिकेत भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेमध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने ‘सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे’ अशी घोषणा केली. ८मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमधील वस्त्रोद्योगातील हजारो सही कामगारांनी रुटगर्स चौकात जमून मोठ्या प्रभागात ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता, या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ग, मालमता आणि शैक्षणिक
पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ श्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रीयांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुस-या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४९ रोजी साजरा करणात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजाच्या समोर येत गेल्या. नित्रयांच्या संघटनांना बळकटी आाली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा खी संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयामधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने ‘संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे तरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले. वेगवेगळ्या देशात ‘महिला दिन’ वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. बल्गेरिया आणि रोमानिया या देशात हा दिवस ‘मातृदिन’
म्हणून साजरा केला जातो या दिवशी मुले आपल्या आईला, आजीला भेटवस्तू देतात. तर इटलीमध्ये या दिवशी पुरुष महिलांना पिवळ्या निमोसाराची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात. महिला दिन हा आपल्या रात्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे
आयोजन केलं जाते. जगभरातील महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकियटूश्या सक्षम बनवण्यावर भर दिला जातो. त्याचबरोबर महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा केला जातो, आणि लिंग समानतेचे महत्व पटवून देण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो. परंतु महिला दिनानिमित्त एक गोष्ट म्हणावीसी वाटते, ‘नारी दिवस बस एक दिवस क्यों नारी के नाम मनाना है, हर दिन, हर पल नागरी उत्तम मानो यह नया जमाना है’। वर्षातून एक दिवस महिला दिन साजरा करण्यापलीकडे जाऊन आपण नेहमीच स्त्रीयांचा सन्मान केला, त्यांचे अधिकार अबाधित ठेवले आणि त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेतली तर खन्या अर्थाने महिला दिन साजरा होईल असे मला वाटते. आंतरराष्ट्रीय महिला
दिनानिमित्त तमाम नारी शक्तिला माझा मानाया मुजरा!!!