आंतर जिल्हा बदलीने रुज झालेल्या शिक्षकांची ज्येष्ठते बाबत inter district transfer sevajeshthata
संदर्भ – 1) महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, 1967 मधील नियम क्रमांक 8
2) ग्राम विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक अंजिब-2018/प्र.क्र.563/आस्था-7 दिनांक 28/01/2019
3) या कार्यालयाचे पत्र क्रमांक जा.क्र. जिपजा/शिक्षण/प्राथ-1/452/2022 दिनांक 09/02/2022 4) गशिअ.स. परतूरयांचे पत्र दि. 14/02/25,20/02/25 व अन्य, गशिअपं. स. अंबड यांचे पत्र दि.02/02/25 व दि.28/02/25
5) महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ यांचे निवेदन दिनांक 25/02/25 व शिक्षक संघटना कृती समिती, जालना यांचे
निवेदन दिनांक 27/02/25
उपरोक्त विषयी संदर्भिय शासन निर्णय व महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, 1967 मधील नियम क्रमांक 8 मधील (दोन) मध्ये आपसांत (परस्पर) बदलीने अशी नेमणूक झाल्यास अशा नेमणूक झालेली व्यक्ती आपल्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठता कायम ठेवील किंवा ज्या जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या पदावर परस्पर बदलीद्वारे नेमणूक झाली असेल त्या कर्मचा-यांची ज्येष्ठता या दोन्हीपैकी जी कमी असेल ती ज्येष्ठता स्वीकारेल. अशी तरतूद आहे. यानुसार जि.प. जालना अंतर्गत आपसी आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या व आपणा मार्फत जि.प. कडे प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांना आपसी शिक्षकांमधील दोन्हीपैकी जी कमी असेल ती ज्येष्ठता देण्यात आलेली आहे. तसेच आपसी आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेले काही शिक्षक जाणिवपुर्वक माहिती सादर करत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे संदर्भ क्रमांक (03) अन्वये आपसी आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या सर्व शिक्षकांना शेवटची संधी देण्यात येवून आपले अधिनस्त सर्व शिक्षकांचा माहितीमध्ये समावेश करणे बाबत आपणास निर्देश देण्यात आलेले होते. तथापी तद्नंतर देखील संदर्भ क्रमांक (04) च्या अनुषंगाने असे निदर्शनास येत आहे की, आपसी आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षकांचे ज्येष्ठते बाबत संदर्भिय शासन निर्णय व महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, 1967 मधील तरतुदीनुसार कार्यवाही झालेली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.
त्या अनुषंगाने आपणास याद्वारे अंतिम निर्देश देण्यात येते की, संदर्भ क्रमांक (01) व (02) नुसार कार्यवाही करणेसाठी आपसी आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या आपले अधिनस्त ज्या शिक्षकांची माहिती अद्यापपर्यंत सादर केलेली नाही अशा सर्व शिक्षकांची माहिती विहित नमुन्यात व खालील नमूद कागदपत्रासह दिनांक 10/03/2025 पर्यंत सादर करावी.
1) नियुक्ती आदेश
2) प्रथम उपस्थिती प्रमाणपत्र
3) आपसी आंतर जिल्हा बदलीचा आदेश
4) उपस्थित झाल्याचे प्रमाणपत्र
5) आपसी कर्मचा-याचे नियुक्ती आदेश, प्रथम उपस्थिती प्रमाणपत्र व कार्यमुक्ती आदेश.
6) इतर अनुषंगिक कागदपत्रे.
वरीलप्रमाणे कागदपत्रासह विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावा, आपसी आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या सर्व शिक्षकांचा माहितीमध्ये समावेश झाल्याबाबत आपण खात्री करावी. एकही शिक्षक वंचित राहिल्यास अथवा समावेश करण्याचा राहिल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी व्यक्तीशः आपणावर राहील. आपसी आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या सर्व संबंधित शिक्षकांना ही शेवटीची संधी देण्यात येत असून यानंतर एकाही शिक्षकांचे आपसी आंतर जिल्हा बदलीने ज्येष्ठतेबाबतचा प्रस्ताव स्विकारला जाणार नाही व तशा प्रस्ताव सादर केल्यास संबंधिता विरुध्द प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. याची सर्व संबंधितांना जाणिव करून देण्यात यावी.
तसेच आपसी आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या सर्व शिक्षकांची जिल्हातंर्गत बदलीसाठी जेष्ठता तुर्तास त्यांचे मुळ सेवा पुस्तिका व अनुषंगिक कागदपत्रांची पडताळणी करुन मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे दाखल रिट याचिका क्रमांक 4022/2022, 4023/2022, 4254/2022 मधील निर्णय दि. 21/04/2022 व रिट याचिका क्रमांक 4741/2022 मधील निर्णय दिनांक 28/04/2022 मधील निर्देशानुसार संदर्भिय शासन निर्णय व महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, 1967 मधील नियम क्रमांक 8 मधील (दोन) मधील तरतूदीनुसार आपसांत (परस्पर) बदलीने अशी नेमणूक झाल्यास अशा नेमणूक झालेली व्यक्ती आपल्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठता कायम ठेवील किंवा ज्या जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या पदावर परस्पर बदलीद्वारे नेमणूक झाली असेल त्या कर्मचा-यांची ज्येष्ठता या दोन्हीपैकी जी कमी असेल ती ज्येष्ठता आपल्यास्तरावरुन देण्यात येवून त्याप्रमाणे बदली पोर्टलवर संबंधिताची माहिती अद्यावत करण्यात यावी. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील. सोबत विहित नमुना.