शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीनुसार उपस्थितीबाबत face recognition biometric attendance 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीनुसार उपस्थितीबाबत face recognition biometric attendance 

शासन निर्णय दि.14/10/2024 च्या अंमलबजावणीबाबत. अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीनुसार उपस्थितीबाबत.

संदर्भ: 1.

शासन निर्णय क्रमाशाअ-2024/प्र.क्र. 71/एसएम-4, दि. 14/10/2024.

2. शासन पत्र क्रःसंकीर्ण-2024/प्र.क्र.209/एसएम-4, दि. 13/12/2024 व दि.03/01/2025.

3. या कार्यालयाचे पत्र समक्रमांक 86, दि.08/01/2025.

4. या कार्यालयाचे पत्र समक्रमांक 300, दि.23/01/2025.

5. शासन पत्र क्रःसंकीर्ण-2024/प्र.क्र.209/एसएम-4, दि.24/02/2025.

6. या कार्यालयाचे पत्र समक्रमांक 925, दि. 03/03/2025.

वरील विषयाबाबत संदर्भीय पत्र पहावीत. (प्रत संलग्न)

संदर्भ क्र.2 येथील शासन पत्रामध्ये नमुद मुद्यांच्या अनुषंगाने परिपूर्ण यादीसह माहिती दि. 13/01/2025 पर्यंत संचालनालयास सादर करण्याबाबत आपणांस कळविण्यात आले होते. तथापि, आपण कोणतीही माहिती संचालनालयास सादर केली नाही. तसेच या कार्यालयाच्या संदर्भ क्र.4 व 6 च्या पत्रान्वये स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर घोषित करावयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची यादी सादर करणेबाबत आपणांस कळवूनही अद्यापपर्यंत आपण कोणतीही माहिती सादर केली नाही. याबाबत आपणांस वारंवार दुरध्वनी तसेच व्ही. सी. द्वारे कळवूनही आपणांकडून माहिती प्राप्त झालेली नाही. वारंवार पत्रव्यवहार करुनही आपणांकडून कोणताही प्रतिसादर प्राप्त होत नाही. ही बाब योग्य नसून यावरुन आपण वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून येते.

शासनाने संदर्भ क्र.5, दि.24/02/2025 च्या पत्रान्वये 1 ते 8 मुद्यांची माहिती मागविली आहे. याबाबत शासन स्तरावरुन सातत्यानं पाठपुरावा होत आहे. सदर बाबीचा गांभीर्याने विचार करुन संदभर्भीय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार दि.07/03/2025 पर्यंत खास दुतामार्फत समक्ष माहिती या कार्यालयास सादर करावी. सदरची माहिती विहित वेळेत सादर न केल्यास आपणांविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

(

Join Now