राज्यातील सर्व शाळांमध्ये इ.१ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा / संकलित मूल्यमापन/PAT चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करणेबाबत pat exam timetable
संदर्भ – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मुल्यमापन / PAT/२०२५ दि. २७.०२.२०२५
संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यांमध्ये शाळास्तरावरुन घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरु असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षों अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. सबब, राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा, यासाठी मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी संदर्भीय पत्राद्वारे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी च्या वार्षिक परीक्षा/संकलित चाचणी २ व नियतकालीक मूल्यांकन (PAT) सन २०२४- २५ साठी वेळापत्रक या कार्यालयास सादर केले आहे.
सदरचे वेळापत्रक विहित मुदतीत आपल्या अधिनस्थ क्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास आणून देऊन वेळापत्रक व संदर्मीय पत्रान्चये दिलेल्या सूचनांनांचे पालन करून परीक्षांचे आयोजन होईल यादृष्टीने आवश्यक कार्यवाही व नियोजन करावे. अपवादात्मक अथवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन वरील नियोजनात बदल करावयाचे असल्यास शिक्षणाधिकारी यांनी मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांची परवानगी घेवूनच बदल करावा.
टिप – मा.आयुक्त शिक्षण यांच्या मान्यतेने