अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत anganvadi sevika paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत anganvadi sevika paripatrak 

संदर्भ:-१) महिला व बाल विकास विभाग, शा. नि. क्र. एबावि-२०२४/प्र.क्र.१३१/का.६, दिनांक ०४.१०.२०२४,

२) महिला व बाल विकास विभाग, शा. नि. क्र. एबावि-२०२४/प्र.क्र.६०/का.६, दिनांक ०८.०४.२०२४, दि. ०७.०५.२०२४, दि. २७.०५.२०२४, दि. २१.०६.२०२४, दि. ०१.०८.२०२४, दि. २८.०८.२०२४, दि. २६.०९.२०२४, दि. २४.१०.२०२४, दि. २२.११.२०२४, दि. २९.११.२०२४, दि. २७.१२.२०२४ व दि. ३१.०१.२०२५

शासन निर्णय :-

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नराल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे गानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून, २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

२. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी, २०२५ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक-१ मधील प्रधान लेखाशीर्ष/उपशीर्ष/उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक २ मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक-४ मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये १९६.७०८७ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

३. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पध्दतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक १४/व्यय ६, दिनांक २९.०१.२०२५ अन्वये

दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेर्ताक २०२५०३०३११३२०७६९३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Join Now