राज्यातील शासकीय, सरकारी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांबाबत medical bill shasan nirnay
राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांसदर्भातील कार्यवाहीचा आढावा.
संदर्भ : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. वैखप्र-२०१५/ (५२२/१५)/टोएनटी-५, दि.२९ एप्रिल, २०१६.
संदर्भाधीन शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतूदीच्या अधीन राहून राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, सैनिकी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.
उक्त शासन निर्णयास अनुसरुन आपल्या कार्यालयाकडे प्राप्त होणा-या शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांचे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसंदर्भात तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. याबाबत मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्तावासंदर्भात तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे सूचित केले असून प्राप्त होणारी प्रकरणे परिपूर्ण असल्यास नियमानुसार तात्काळ मंजूर करण्याचे व प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यास त्याप्रमाणे तात्काळ त्रुटीपूर्ततेसाठी प्रस्ताव परत करुन प्रलंबित न ठेवण्याचे निर्देशित केले आहे.