OTT बदली पोर्टलवर शिक्षकांनी कोणत्या गोष्टी UPDATE कराव्यात व कोणत्या करू नयेत महत्त्वाची माहिती teacher transfer portal
सर्व शिक्षकांनी वाचणे सक्तीचे आहे
कृपया आपल्या प्रोफाइलमधील माहितीची पडताळणी करावी आणि सर्व फील्ड्समध्ये बरोबर माहिती दिलेली आहे हे तपासून घ्या.
OTT पोर्टलची अधिकृत लिंक येथे पहा Click Here
शिक्षकाला त्याने / तिने प्रोफाइलमध्ये दिलेल्या माहितीत केवळ एकदाच बदल करता येईल.
सर्व शिक्षकांनी आपल्या नोकरीबद्दलचे तपशील यातील सर्व फील्ड्समधील माहिती तपासून घेतली पाहिजे आणि तिची पडताळणी केली पाहिजे. शिक्षकाची बदली ही पूर्णपणे त्याने/तिने या संकेतस्थळामध्ये पुरवलेल्या माहितीवर अवलंबून आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.
शिक्षकाने पुरवलेली माहिती चुकीची असल्यास, चुकीची व अवैध माहिती दिल्याच्या परिणामी चुकीच्या ठिकाणी बदली होईल.
दिलेली माहिती १००% अचूक आणि पडताळणी केलेली असणे अपेक्षित आहे. दिलेल्या माहितीची गट शिक्षण अधिकारी मार्फत तपासणी होणार असली तरी अचूकता आणि स्वीकारण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे.
शिक्षक सर्व २ अर्जाची पडताळणी करतील आणि स्वीकारतील.
• वैयक्तिक तपशील
• नोकरीबद्दलचे तपशील
एकदा पडताळणी केल्यावर, शिक्षकांनी ‘स्वीकार करा’ (Accept) बटण दाबावे. त्यानंतर शिक्षकाची प्रोफाइल कायमची संग्रहित होईल व त्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
प्रोफाइल मधील माहिती भरत असताना या ३ गोष्टी आवश्यक आहेत –
1. उत्तम इंटरनेट कनेक्शन
2. ओटीपी एसएमेस मिळवण्यासाठी व वाचण्यासाठी नोंद केलेला मोबाइल नंबर असलेला मोबाइल फोन.
3. माहिती प्रमाणित करण्यासाठी शिक्षकाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांची आणि / किंवा सेवा पुस्तकाची प्रत.
महत्त्वाचे
*बदली पोर्टल अपडेट*
दि.27.02.2025
सर्व शिक्षकांना *रीड ओन्ली* मोडमध्ये बदली पोर्टल लॉग इन सक्षम केलेले आहे.
जर शिक्षकांच्या प्रोफाइल मध्ये
👉Salutation
👉First Name
👉Middle Name
👉Last Name
👉Date Of Birth
👉Gender
👉Mobile Number
👉Aadhar Number
👉Shalarth Id
👉Marital Status
यामध्ये काही बदल करावयाचा असल्यास मा.मुख्यकार्यकारी अधिकारी/मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी विनंती अर्ज करावा लागेल व ज्या फिल्डमध्ये बदल करावयाचा आहे त्याबाबत चे योग्य ते कागदपत्र सोबत जोडावे लागतील.
*************************
जर शिक्षकांच्या *Employment Details* मधील माहितीत
👉Date Of Appointment In Zp
👉Cast Category
👉Appointment Category
👉Current District Joining Date
👉Udise Code Of Current School
👉Current School Joining Date
👉Current Teacher Type
👉Teaching Subtype
👉Teaching Medium
👉Last Transfer Category
👉Last Transfer Type
👉Current Area Joining Date
👉Have You Work Continously Non Difficult Area For Last Ten Years?
👉Have you Been Suspended in Last 10 Years?
बदल करावयाचा असल्यास त्याबाबत सर्व शिक्षकांना लॉग इन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
*महत्वाची सूचना*
*Personal Details*
माहितीत बदल असल्यास
अर्ज नमुना व माहिती फॉर्म तयार करून पाठवला जाईल.
तसेच त्याबाबतच्या पुढील सूचना लवकरच दिल्या जातील.
शिक्षण विभाग (प्राथमिक)
जिल्हा परिषद कोल्हापूर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷