जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली सन २०२५ कामी शिक्षक व शाळा माहिती अद्ययावत करणेबाबत inter district online transfer
संदर्भ :
– १) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, यांचेकडील शासन निर्णय क्रमांक : जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ दिनांक १८ जून, २०२४.
२) दि.२४/०२/२०२५ रोजी या कार्यालयामार्फत अयोजित व्हि.सी मधील सूचना
उपरोक्त विषयानुसार, जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया सन २०२५ ही ऑनलाईन पद्धतीने राबविणेत येते. त्यानुषंगाने आपले स्तरावर व विन्सीस ऑनलाईन टिचर ट्रान्सफर या प्रणाली वर करावयाचा कार्यवाहीबाबत वरील संदर्भ क्र २ अन्वये सूचना देणेत आलेल्या आहेत. तरी सदर कार्यवाहीबाबतची तांत्रिक कार्यपद्धती खालीलप्रमाणे :-
अ) Active Teachers
१) माहे नोव्हेंबर २०२३ अखेर प्रणालीवर माहिती अद्ययावत असलेने, त्यानुसार प्रणालीवर उपलब्ध एकूण ५४८६ शिक्षक यादीची एक्सल शीट या पत्रासोबत आपणास पुरवणेत येत आहे. (सदर एक्सल शीट ची आपले गटनिहाय फोड करू नये. पाठविणेत आलेप्रमाणे कोणताही बदल न करता एकत्रित एक्सल वरच कार्यवाही करावी.)
२) सदर यादीमध्ये आपले गटाकडील कार्यरत शिक्षक त्यांचे नांव / शालार्थ आयडी अन्वये शोधावा.
३) सदर शिक्षकांचे शेरा कॉलम मध्ये ACTIVE असा शेरा नमूद करावा.
४) माहिती नोव्हेंबर २०२३ ची असलेने कार्यरत तालुका चुकीचा असू शकतो, यास्तव तालुका कॉलम मध्ये तालुका अपडेट करावा.
५) वरील प्रमाणे प्रक्रिया झालेनंतर सदर शिक्षकाची एक्सल मधील Row पिवळया रंगाने ठळक करावी. (याव्यतिरीक्त उर्वरीत सर्व शिक्षक हे आपले गटाकडील Inactive शिक्षक समजणेत येतील याची नोंद घ्यावी. स्वतंत्र Inactive शेरा नमूद करणेची आवश्यक नाही.)
ब) Active Schools
१) प्रणालीवर उपलब्ध एकूण १६८६ शाळांची यादीची एक्सल शीट या पत्रासोबत जोडणेत आलेली आहे. सदर यादीमधील शाळांची माहिती तपासून वरील अ मध्ये नमूद कार्यपद्धतीप्रमाणे Active व Inactive शाळांची माहिती तयार करावी.
क) Inactive Teachers
१) प्रणालीवर उपलब्ध एकूण १७८ Inactive शिक्षक माहितीची एक्सल शीट या पत्रासोबत जोडणेत आलेली आहे. सदर शिक्षक हे से. नि/स्वेच्छा से.नि मयत/जिल्हा बदली/बडतर्फ सेवेतून कमी करणे इ. कारणांमुळे बदली प्रक्रियेतून Inactive केले असलेने, पैकी काही शिक्षक पुन्हा Active (कार्यरत) झाले असलेस याबाबत वरील अ मध्ये नमूद कार्यपद्धतीप्रमाणे कार्यवाही करून माहिती तयार करावी.
ड) ADD Teachers
१) उपरोक्त नमूद केलेप्रमाणे बदली प्रणालीवर माहे नोव्हेंबर २०२३ अखेरची माहिती उपलब्ध आहे. परंतू तदनंतर नियुक्त / हजर शिक्षकांना लॉगीन उपलब्ध होणेसाठी सर्व BEO लॉगीन वर शिक्षक ADD करता येतील.
२) यास्तव आपले गटाकडील सर्व नवनियुक्त व समायोजन/आंतरजिल्हा बदलीने हजर शिक्षकांना आपले लॉगीन वरून प्रणालीवर ADD करावे.
३) वरील अ व क मध्ये नमूद जिल्हास्तरावरील यादीमध्ये समाविष्ट नसणारे परंतू आपले गटाकडे कार्यरत असणारे सर्व शिक्षक हे प्रणालीवर ADD होतील व एकही कार्यरत शिक्षक लॉगीन पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
४) प्रणालीवर शिक्षक ADD करणेसाठी BEO Login > Data Update > Add ही प्रक्रिया वापरावी, व संबंधित शिक्षकाची माहिती भरून OTP अन्वये कार्यवाही पूर्ण करावी.
उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करून, वरील अ. ब. व क मध्ये नमूद एक्सल शीट ची सॉफ्टकॉपी व स्वाक्षरीत हार्डकॉपी ही दि.२८/०२/२०२५ अखेर या कार्यालयास सादर करावी. तदनंतर या कार्यालयामार्फत सदरची माहिती प्रणालीवर अद्ययावत करणेत येईल,
तसेच, वरील नमूद ड प्रमाणे दि.२८/०२/२०२५ पर्यंत आपलेकडील (अ ब क यादीमध्ये समाविष्ट नसलेले) सर्व कार्यरत शिक्षक प्रणालीवर ADD होणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी.
सदर कामकाजास्तव आपणास अतिरीक्त लॉगीन आवश्यक असलेस याबाबत लॉगीनधारकाचे पूर्ण नांव, पदनाम, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ. माहिती नमूद असणारे आपले स्वाक्षरीत पत्र दि.२५/०२/२०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत सादर करावे.
जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया ही कालमर्यादेमध्ये व विहीत वेळापत्रकानुसार पार पडणार असलेने सदर बाबत कोणताही विलंब अथवा टाळाटाळ होणार नाही तसेच सदर कार्यवाही दरम्यान संदर्भ क्र.१ मध्ये नमूद शासन निर्णयातील तरतूदींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. अथवा सदर बाबत आपण जबाबदार रहाल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
सोबत :- वरील अ, ब व क मध्ये नमूद नुसार एक्सल शीट