लाडक्या बहिणींमुळे तिजोरीत ठणठणाट १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिने डीए नाही dearness allowance 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडक्या बहिणींमुळे तिजोरीत ठणठणाट १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिने डीए नाही dearness allowance 

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी)- महायुती सरकारने सर्व निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्यामुळे राज्याच्या तिजोरीत सध्या ठणठणाट होऊ लागला आहे. निधीची चणचण भासू लागल्यामुळे राज्यातील सुमारे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यांपासून महागाई भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड अस्वस्थता आहे. प्रलंबित महागाई भत्ता त्वरीत न दिल्यास सरकारी कर्मचारी मार्चमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहेत.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

१ जुलै २०२४ पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार देय असलेल्या घरभाडे भत्त्याची पुनर्रचना करा.

१ जुलै २०२४पासूनचा तीन टक्के महागाई भत्ता त्वरीत मंजूर करावा.

वेतन त्रुटी दूर करण्यासाठी खुल्लर समितीचा अहवाल त्वरीत प्रसिद्ध करा

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या १ मार्च २०२४पासून अंमलबजावणी संदर्भातील शासन आदेश त्वरीत जारी करा.

लाडकी बहीण योजना आहेच पण सरकारने लाडके सरकारी कर्मचारीही म्हणावे. महागाई भत्त्यापोटी सुमारे ९०० ते १०० कोटी रुपये प्रलंबित आहेत. डीएच्या मागणीसाठी आम्ही लवकरच आंदोलन पुकारणार आहेत.

विश्वास काटकर, निमंत्रक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना.

Join Now