पवित्र पोर्टल होणार सुरू ; शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण : जिल्हा परिषदेच्या सूचनांकडे लागले लक्ष pavitra Portal recruitment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टल होणार सुरू ; शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण : जिल्हा परिषदेच्या सूचनांकडे लागले लक्ष pavitra Portal recruitment 

सोलापूर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. १८ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविली जाणार आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल रन झाले असून, पोर्टल अॅक्टिव होण्याची शक्यता असून, लवकरच ते सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

दरम्यान, बदली प्रक्रियेची अधिक माहिती आणि ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे, अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबतची कार्यवाही २८ फेब्रुवारीपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी जिल्हांतर्गत बदली पोर्टलवर त्यांच्या लॉगिनवरून त्यांच्या जिल्ह्याच्या नवीन शाळा आणि शिक्षकांचा हेटा जोडू शकतात. तसेच ते डेटा अपडेट आणि हटवू शकतात. बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्या शिक्षकांना रिहा ओन्ली मोड मध्ये त्यांच्या प्रोफाईलमधील माहिती दिसणार आहे.

चुकीची माहिती भरल्यास शिस्तभंगाची कारवाई

शिक्षकांनी आपले वैयक्तिक प्रोफाईल २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे. चुकीची माहिती भरल्यास शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते. या वेळापत्रकात बदल होऊ शकतो, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने म्हटले आहे. ज्या शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करावयाचे आहे ते अपडेशन तालुकास्तरीय पडताळणीनंतर जिल्हास्तरावरून होणार आहे.