दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याबाबत chatrapati shivaji maharaj jayanti

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याबाबत chatrapati shivaji maharaj jayanti 

प्रस्तावना :

शासनामार्फत दरवर्षी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. दिनांक १९ फेब्रुवारी चे औचित्य साधून या थोरपुरूषांचे ज्या-ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेत, तेथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी. तसेच ज्या-ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे /स्मारके आहेत त्या परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणांकडून रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभिकरण करून घेण्यात यावे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सार्वजनिक कार्यक्रम करताना राज्याच्या राज्य गीताचे गायन करण्यासंदर्भात सन २०२३ व २०२४ मध्ये स्वतंत्ररित्या परिपत्रक निर्गमित करण्यात येत होते. दरवर्षी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत असल्याने आगामी वर्षांसाठी सुचनांचे स्थायी परिपत्रक निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.

परिपत्रक :

२. छत्रपती शिवाजी महाराजांची दरवर्षी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून या थोरपुरुषांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे /स्मारके आहेत, तेथे रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभिकरण करुन घेऊन ते झाल्याची खातरजमा संबंधित विभाग प्रमुख यांनी करुन घ्यावी.

३. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. सदरच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे

शासन परिपत्रक क्रमांकः GAD-४९०२२/९/२०२५-GAD (DESK-२९)

अनुपालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करुन सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. तद्नंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात यावे.

४. उपरोक्त उल्लेखित उपक्रम यशस्वीरित्या पार पाडावयाचे असल्याने, त्याचे योग्य व काळजीपूर्वक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी दिनांक १९ फेब्रुवारी, रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे सर्व बार्वीची काटकोरपणे नियोजन करुन अंमलबजावणी करावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा सांकेतांक २०२५०२१४१६३२१६०००७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

Join Now