सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा; कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार – मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ssc hsc board exam don’t copy 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा; कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार – मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ssc hsc board exam don’t copy 

■ दहावी बारावी परीक्षेच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा; यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत संवाद

इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून १८ मार्चपर्यंत ३,३७३ परीक्षा केंद्रावर तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रावर होणार

■ परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश; परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्याचे आदेश

■ परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी; भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना

■ सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्याचे निर्देश

बैठ्या पथकाने परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परिक्षा केंद्रावर पोहोचावे व परिक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिका-यांची बैठ्या पथकात नेमणूक करण्याचे आदेश

संवेदनशील परिक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेराव्दारे आणि व्हिडीओ कॅमेराव्दारे पूर्णवेळ निगराणी करण्याच्या सूचना

■ सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या सूचना

■ परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी

शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी

इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेटी देण्याच्या सूचना

Join Now