संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping तात्काळ पूर्ण करणेबाबत shalarth pranali post mapping 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping तात्काळ पूर्ण करणेबाबत shalarth pranali post mapping 

संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/४२४ दि. १९/०१/२०२३.

२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/४३७१ दि. २५/०८/२०२३.

३) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/४९१८ दि. २०/०९/२०२३.

४) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/५२६७दि. १३/१०/२०२३.

उपरोक्त विषयी संदर्भिय पत्राचे अवलोकन करावे.

उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रान्वये संचमान्यतेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे Post Mapping करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती सदर सुविधेनुसार Post Mapping ची कार्यवाही शालार्थ मध्ये तातडीने पूर्ण करणेबाबत आपणास संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतू अद्यापही शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेनुसार सर्व कर्मचा-यांचे Post Mapping पूर्ण झालेले नाही.

शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping पुर्ण केल्याशिवाय सप्टेंबर २०२३ चे वेतन देयक (बिल) शालार्थ प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही असे संदर्भ क्र. २ अन्वये कळविण्यात आले होते. परंतू मा. आमदार व विविध संघटना यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्र. ३ अन्वये माहे सप्टेंबर २०२३ चे वेतन आहरित करण्यास मान्यता देण्यात आलेली होती. व Post Mapping पूर्ण करण्यसाठी १ महिना मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये पुनश्च १ महिना मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि अद्यापही बहुतांश कर्मचा-यांचे Post Mapping पुर्ण झालेले नाही. त्यामुळे सदर बाबतीत Post Mapping पुर्ण करण्यासाठी दि.२/२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. अद्यापही प्रलंबित असलेल्या Post Mapping चा तपशिल सोबत डिडिओ-१ शाळानिहाय Excel Sheet आणि डिडिओ-२ अधीक्षक, वेतन पथक Excel Sheet सोबत जोडला आहे.

तरी आपल्या जिल्हयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे संचमान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानु‌सार Post Mapping करणे आवश्यक असल्याने शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping दिनांक २२/०२/२०२५ पर्यंत पुर्ण करण्यात यावे. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी आपलेस्तरावरून संबंधित कार्यालयास सूचित करावे.

Join Now