१२.७५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही income tax
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा १२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना आता कोणताही आयकर भरावा लागणार नाही, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली असली तरी त्यात ७५ हजार रुपयांची प्रमाणित वजावट समाविष्ट केली तर ही मर्यादा १२.७५
लाख होते. या मर्यादेत आतापर्यंत ८० हजार रुपये प्राप्तिकर भरावा लागत होता. नव्या आयकर रचनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या चाकरमान्यांचे हे पैसे आता वाचतील. त्याचवेळी १२.७५ लाखांच्या वर १ रुपयादेखील जास्त उत्पन्न असेल तर मात्र किमान ४२ हजार रुपये आयकर भरावा
लागेल. १२ लाखांच्या पुढे ४ ते ८ लाखांवर ५ टक्के, ८ ते १२ लाखांवर १० टक्के, तर १२ ते १६ लाखांवर १५ टक्के आयकर भरावा लागेल. १६ ते २० लाख उत्पन्नावर २० टक्के, तर २० ते २४ लाखांच्या उत्पन्नावर २५ टक्के आयकर भरावा लागणार आहे. नव्या आयकर रचनेवर हा दृष्टिक्षेप-