सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चादर,बेडशीट,बॅरक कंबल (लोकरी ब्लॅकेट) आणि सतरंजी खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत social hostel nivasi shala 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चादर,बेडशीट,बॅरक कंबल (लोकरी ब्लॅकेट) आणि सतरंजी खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत social hostel nivasi shala

वाचा:-

१) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांकः- भांखस-२०१४/प्र.क्र. ८२/ भाग- ॥॥ / उद्योग-४, दि. ०१ डिसेंबर, २०१६.

२) शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य क्रिडा व पर्यटन विभाग, क्रमांक:-बीसीएच-१०८२/९०३८५/ (३८) बीसीडब्लू-४, दिनांक १६ मे, १९८४.

३) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांकः- बीसीएच- २०१०/प्र.क्र.४३०/मावक-४, दिनांक २६ जुलै, २०११.

४) आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचे पत्र क्र. सकआ / शिक्षण / सोयीसुवि/ शावगृ. शानिशा/ खरेदी २३-२४/का-५/७३२, दि. २६ फेब्रुवारी, २०२४.

प्रस्तावना:-

५) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक बीसीएच- २०२४/प्र.क्र.५७/शिक्षण-२, दि.१४.१०.२०२४

सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहे व अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. सदर शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, बेडशीट, चादर, बैरक कंबल (लोकरी ब्लॅकेट), सतरंजी तसेच दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता इत्यादी सोयी-सुविधा देण्यात येतात. त्यानुषंगाने विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बेडशीट, चादर, बैरक कंबल (लोकरी ब्लॅकेट) आणि सतरंजी या वस्तुंची खरेदी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भ क्रमांक ४ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावानुसार सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा अंतर्गत बेडशीट, चादर, बॅरक कंबल (लोकरी ब्लँकेट) आणि सतरंजी या वस्तुंची खरेदी राखीव ठेवण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादीत, मुंबई (महाटेक्स) व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर, तसेच ई-निविदा/जेम पोर्टलवरून

खरेदी करण्यासाठी खालील रकान्यात नमूद केल्याप्रमाणे एकूण रू. ११,२५,९४,९३३/- (रू. अकरा कोटी पंचवीस लाख चौऱ्यान्नव हजार नऊशे तेहत्तीस फक्त) इतक्या रक्कमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ) महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादीत, मुंबई (महाटेक्स) यांचेमार्फत खरेदी करावयाच्या वस्तूंचा तपशील खालीलप्रमाणे :

उपरोक्त खरेदी संदर्भातील अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत:-

अ) पुरवठादार संस्थेने पुरवठा करावयाच्या वस्तुंच्या आवश्यकतेनुसार आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्याकडे नमुने सादर करावेत. त्यांनी सदर नमुने मंजूर करून ते सबंधित संस्थेकडे द्यावेत.

आ) मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराने सबंधित वसतिगृहाच्या अधीक्षक/गृहपाल यांच्याकडे वरील मान्य करण्यात आलेले नमुने दाखवून त्यानुसार मालाचा पुरवठा करावा.

इ) संबंधित गृहपालांनी पुरवठादाराकडून वस्तु मिळाल्याची पोचपावती आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचेकडे सादर करावी.

३. उपरोक्त खरेदी प्रक्रिया करण्याकरिता आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात येत आहे. याबाबत होणारा खर्च मागासवर्गीय शैक्षणिक संस्थावरील सोयी-सुविधा वाढविणे या योजनेंतर्गत लेखाशिर्ष २२२५ ३३३१, ३१ सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्षांतर्गत उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा. सदर लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रू. २५० कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने सामाजिक न्याय विभागांतर्गत विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना सोयी- सुविधा अंतर्गत बेडशीट, चादर, बैरक कंबल (लोकरी ब्लँकेट) आणि सतरंजी खरेदी करण्यासाठी येणारा खर्च हा लेखाशिर्ष २२२५ ३३३१, ३१- सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामधील मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा.

४. सदर आदेश, शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२, दिनांक १७.४.२०१५, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८, भाग-पहिला, उपविभाग-तीन, अ.क्र.४, परि. क्र. २७ (२) (अ), भाग-पहिला, उपविभाग-२, अ.क्र.२७ अ, नियम क्र.७६, अ.क्र. ३७, नियम क्र.९०, अ.क्र.४५, नियम क्र.१६९ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार व वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.७३९/ २०२४, दिनांक ११.१०.२०२४ अन्वये मिळालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०१२७१६२३५७९२२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,