जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू;२८ फेब्रुवारीपर्यंत यादीवरील आक्षेप घेण्याची मुभा primary teacher online transfer
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या
बदल्यांमध्ये कोणताही घोळ होऊ नये, यासाठी ग्रामविकास विभागाने आतापासूनच तयारी केली आहे. १ जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन ३१ मेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून, या याद्यांवर २८ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहे.
१ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे यांची माहिती जिल्हा परिषद निश्चित करेल. १ ते २० एप्रिल या कालावधीत बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा बदलीची प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीला उपलब्ध करून
द्यायचा आहे. २१ ते २७ एप्रिल या कालावधीत टप्पा क्रमांक १ नुसार समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित केली जातील.
२८ फेब्रुवारीपर्यंत यादीवरील आक्षेप घेण्याची मुभा
२८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित केल्या जातील. त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देऊन बदलीची प्रक्रिया राबवली जाईल. ४ ते ९ मे दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग २ च्या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित केल्या जातील व त्यांच्या बदल्या केल्या जातील. १० ते १५ मे दरम्यान बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या होतील. १६ ते २१ मे दरम्यान बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या होतील. २२ ते २७ मे दरम्यान विस्थापित शिक्षकांच्या बदल्या होतील. २८ ते ३१ मे दरम्यान अवघड क्षेत्रातील जागा भरल्या जातील.