सन 2024-25 मधील विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अमस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) करिता शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत science and maths shikshak prashikshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2024-25 मधील विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अमस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) करिता शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत science and maths shikshak prashikshan

संदर्भ :

– 1. मा. उपसंचालक (समन्वय), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. यांचे पत्र क्र. राजैसंवधपम/विवी/गा.स./2024-25/05604 दिनांक 26/11/2024

2. श्री. सेल्वा नेखर एन. सह. व्यवस्थापक, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अमस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन, कुप्पम), बंगलोर यांचे पत्र दिनांक 26/11/2024.

3. प्रकल्प समन्वयक (महाराष्ट्र प्रमुख), अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन यांचा इ-मेल व Whats App संदेश दिनांक 15/01/2025.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये, अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन व शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मध्ये शिक्षक व शिक्षक प्रशिक्षक यांचे करिता विज्ञान व गणित विषयाच्या प्रशिक्षणाबाबत, संदर्भ क्र. । अन्वये, सदर प्रशिक्षण कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता पस्वालमी देण्यात आलेली आहे. संदर्भ क्र. 2 अन्वये, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत 3 बंचेस मध्ये महाराष्ट्रातील एकूण 270 विज्ञान व गणित शिक्षकांचे प्रशिक्षण येणेबाबत कळविण्यात आले आहे.

त्यानुसार सन 2024-25 मध्ये विज्ञान व मणित शिक्षकांसाठी “constructivism” in Hands On Teaching Workshop या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रातील तृतीय प्रशिक्षण वर्ग (बंच क्र.3) दिनांक 28/01/2025 ते 31/01/2025 या कालावधीत अगस्त्या फाउंडेशन कुप्पम, आंध्रप्रदेश येथे आयोजित करण्यात आले आहे व या प्रशिक्षणासाठी आपल्या जिल्ह्यातील यादीत दिलेल्या शिक्षकांची निवड झालेली आहे. या त्रिवड झालेल्या

शिक्षकांना उपरोक कालावधीसाठी, उपरोक्त ठिकाणी पाठवायचे आहे. संदर्भ क्र. 2 अन्वये, या प्रशिक्षणा करिता दैनिक व प्रवास भत्ता अगस्त्या फाउंडेशन कुप्पम यांचे कडूज अदा करण्यात येणार असून या करिता द्वितीय शयनयान श्रेणीचा (Sleeper Class) प्रवास मान्य आहे त्याची प्रतिपूर्ती प्रशिक्षण पूर्ण केल्यावर संबंधित शिक्षकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तरी संदर्भ क्र. 3 अन्वये, सदर प्रशिक्षणास संबंधित शिक्षकांना आपल्या स्तरावरून दि. 28 जानेवारी 2025 रोजी नियोजित वेळी प्रशिक्षण स्थळी पोहोचतील अशा बेताने कार्यमुक्त करण्यात यावे.

आगाऊ आरक्षणाबाबत नियोजन करणे हि संबंधित शिक्षकाची वैयक्तिक जबाबदारी असून कुप्पम येथे जातांना प्रथम बंगळूरू व बंगळूरू ते चेन्नई रेल्वे मार्गाने (अंदाजे 125 km) कुप्पम येथे पोहचता येते. कुप्पम रेल्वे स्थानक ते Agastya creativity lab, Gudappalli पर्यंत जाण्याची व्यवस्था अमस्या फाउंडेशन तर्फे करण्यात येईल.

टिप :- या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहील्यास शिक्षकांकडून प्रशिक्षणाचा खर्च वसूल करण्यात

येईल याची नोंद घ्यावी.

शिक्षकांनी इ.8,9,10 वी चे विज्ञान व गणित विषयाचे पाठ्यपुस्तके, प्रवासाची तिकिटे व बैंक पासबुक ची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

सहपत्र-प्रशिक्षणार्थी शिक्षकांची यादी.