मुख्याध्यापक, शिक्षकांचे समायोजन होणार:सीईओंनी काढले पत्र; अतिरिक्त गुरुजींसाठी दिलासादायक बातमी samayojan
सोलापूर : उपसंचालक शिक्षण विभाग, पुणे यांच्याकडील मंजूर, ऑनलाइन प्राप्त संचमान्यता सन २०२३-२४ नुसार मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांचे अतिरिक्त झालेले मुख्याध्यापक, उपशिक्षक व पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक यांचे समायोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया २३ व २४ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण करण्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काढले आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०२३ च्या पटसंख्येनुसार
शाळांची गुणवत्ता वाढण्यास होईल मदत…
या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या निर्णयाचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या निर्णयाचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.
संचमान्यता झाली होती. ज्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची कमी झाली आहे, त्या ठिकाणचे शिक्षक व मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. ज्या ठिकाणचे रिक्त पदावर समायोजन होणार आहे. त्यामुळे जिथे खरोखर शिक्षकांची गरज आहे, त्या ठिकाणी शिक्षक मिळणार आहेत.
संबंधित तालुका पातळीवरील यंत्रणेने प्रचलित कार्यपध्दतीचा व शासन
अशी राबविली जाते समायोजन प्रक्रिया…
प्रत्येक तालुक्याकडून माहिती मागवून सीईओंची मान्यता घेतली जाते. अतिरिक्त शिक्षकांना आणि रिक्त पदे असलेल्या शाळांना हरकती सादर करण्याची मुदत ठेवली जाते. समानीकरणाच्या तत्त्वानुसार शिक्षकांचे समायोजन केले जाते. दोन दिवसाच्या कालावधीत समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
निर्णयातील मार्गदर्शक सूचना यांचा अवलंब करून समायोजन करण्यात यावे, समायोजन पूर्ण होताच परिपूर्ण कागदपत्रासह अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी त्या त्या तालुका गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांची असणार