शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा आळख (Face Recognition) प्रणालीनुसार उपस्थितीबाबत face recognition biomatric presenty
शासन निर्णय दि. 14/10/2024 च्या अंमलबजावणीबचत अनुदानास पात्र करण्यात आलोल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा आळख (Face Recognition) प्रणालीनुसार उपस्थितीबाबत.
संदर्भ: 1. शासन निर्णय क्र.माशाअ-2024/प्र.क्र. 71/एसएम-4, दि.14/10/2024
2. शासन पत्र क्र.संकीर्ण-2024/प्र.क्र.209/एसएम-4, दि. 13/12/2024 व दि.03/01/2025 3
. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्रःआस्था क/टे.क्र.प्राथ.शा.प./22705/2025/18..06/01/25
वरील विषयाबाबत संदर्भीय पत्र पहावीत. (प्रत संलग्न)
संदर्भ क्र.2 येथील पत्रात नमूद केल्यानुसार शासन निर्णय दि. 06/02/2023 मधील अट क्र.6 व 12 आणि शासन निर्णय दि. 14/10/2024 मधील अट क्र.5 व 11 अन्वये अनुदान पात्र शाळांमधील विद्याची, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीद्वारे नदिविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यावाचतही नमूद केले आहे
या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, शासन पत्र दि. 13/12/2024 मधील मुद्दा क्र.3, 4 व 5 बाबतची माहिती परिपूर्ण वादीसह संचालनालयास दि. 13/01/2025 पर्यंत सादर करावी.