दि.25 जानेवारी “राष्ट्रीय मतदार दिन” कार्यक्रम राबविणेबाबत National Voters’ Day celebration 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.25 जानेवारी “राष्ट्रीय मतदार दिन” कार्यक्रम राबविणेबाबत National Voters’ Day celebration

संदर्भ: भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. ४९१/ECI/LET/FUNC/SVEEP-I/NVD/२०२४ दि. ०२.०१.२०२५.

महोदय/महोदया,

उपरोक्त संदर्भाधिन भारत निवडणूक आयोगाच्या दि. ०२.०१.२०२५ रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडून पाठवित आहे.

२. दि. २५ जानेवारी, २०२५ रोजी १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा आहे. सदर १५ व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी ‘Nothing like voting, I Vote for sure’ हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आला आहे.

३. भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्याकरिता सर्वसमावेशक प्रचार प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तीचा समावेश, विविध संस्थेशी भागिदारी व सहयोग, समाज माध्यमांमार्फत राबविण्यात येणार विविध उपक्रम यासंदर्भात सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. तसेच, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्र स्तर व जिल्हा स्तरावर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करताना करावायाच्या सविस्तर सूचना दिल्या आहेत. यानुषंगाने, भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भाधिन पत्रात नमूद केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हास्तरावर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात यावा, ही विनंती.