प्राथमिक शिक्षकांचे मुळ सेवा पुस्तक अदयावत करणेबाबत. व दिव्यांगांची माहिती सादर करणेबाबत primary teacher service book updation
संदर्भ
:- 1. प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांचे समवेत दिनांक 26/07/2024 रोजी शिक्षकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरीता आयोजित सहविचार सभा.
2. या कार्यालयाचे पत्र क्रमांक/बुजिप/शिप्रा/3597/24, दिनांक 16/08/2024
3. प्रहार शिक्षक संघटना यांचे पत्र क्र.94 दिनांक 30.12.2024 रोजीचे निवेदन
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास सुचित करण्यात येते की, आपल्या पंचातय समिती अंतर्गत कार्यरत मुख्याध्यापक, विषय शिक्षक व सहाय्यक अध्यापक यांचे मुळ सेवा पुस्तके पंचायत समिती स्तरावर विशेष कॅम्प चे आयोजन करण्यात येऊन सर्व मुळ सेवा पुस्तके अदयावत करण्यात यावी व मुळ सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत तयार करण्याबाबत तसेच दिव्यांग कर्मचा-याची माहिती सोबतच्या प्रपत्रानुसार कार्यवाही तात्काळ करण्याबाबत आपणास सुचित करण्यात आले होते.
परंतु अदयापर्यत सदरची माहीती प्राप्त झाली नाही ही बाब खेदजनक आहे. तरी याद्वारे आपणास अंतीमतः सुचित करण्यात येते उपरोक्त माहीती दिपस प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांचे कडे देण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.