सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत online deyak sadar 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत online deyak sadar 

सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत.

संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकोत/ऑनलाईन/५०४७

दि. ११/९/२०२४

२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन/मुदतवाढ/५१८६

दि. २५/९/२०२४.

उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शी संबंधित सर्व थकीत देयके संबंधित शाळांनी दि. १५/१०/२०२४ पर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले होते.

तथापि त्यानंतर शिक्षणाधिकारी/अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयकाची ऑनलाईन पडताळणी करून संचालनालयास ऑनलाईन सादर करणे अपेक्षित होते. परंतू अद्यापही अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर थकीत देयके प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. ही बाब प्रशासकीयदृष्टया योग्य नाही.

सबब अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांना थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करून देण्यात येत आहे.

तरी वरील तक्त्यामध्ये नमूद दिनांकापर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये प्राप्त ऑनलाईन थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन संचालनालयास सादर करावी. तसेच क्षेत्रिय समितीचा सर्व सदस्यांचा संयुक्त स्वाक्षरीचे विहित नमुन्यातील

विवरणपत्र क्रमांक १, २, व ३ ची हार्ड कॉपी संचालनालयास सादर करावी, तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयक प्रस्तावासोबत विधी अधिकारी यांचे स्वाक्षरीसह न्यायालयीन प्रकरणाबाबतचे विहित नमुन्यातील विवरणपत्र, घटनाक्रम व इतर आवश्यक कागदपत्रासह हार्ड कॉपी सादर कराबी, त्यानंतर सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके स्विकारली जाणार नाही. व त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी