सन 2024-25 च्या संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा पोर्टल लिंक उपलब्ध sanchmanyata update

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2024-25 च्या संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा पोर्टल लिंक उपलब्ध sanchmanyata update

 सन 2024 25 च्या संच मान्यतेची माहिती खालील प्रमाणे भरा

Step 1- school portal open करा.

Step 2 – school portal वरुन संच मान्यता यावर CLICK करुन लॉगिन करा 

संचमान्यता पोर्टल वर लॉगिन करण्यासाठी अधिकृत लिक होते पहा Click Here 

Step 3 – लॉगीन साठी User name शाळेचा Udise Code वापरा. Password हा school portal चा use करा.

Step 4 लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये working Staff Teaching वर क्लिक करा.

संचमान्यतेबाबत दिनांक 15 मार्च 2024 चा शासन निर्णय पहा

Step 5 – त्यानंतर सन 2024-25 tab निवडावे.

संच मान्यतेचे सुधारित निकष येथे पहा

Step 6 त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय 01.10.2024 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize या टॅबवर क्लिक करा

Step 7 – त्यानंतर Working Post मधून Add Working non Teaching staff हा पर्याय निवडा.

संच मान्यतेबाबत दिनांक 11 ऑक्टोबर 2024 चा महत्त्वाचा शासन निर्णय येथे पहा

Step 8 – त्यानंतर सन 2024-25 निवडावे.

Step 9- त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 01.10.2024 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा.

संचमान्यता पोर्टल वर लॉगिन करण्यासाठी अधिकृत लिक होते पहा Click Here 

महत्त्वाची माहिती वाचा 

राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या उदा. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानीत, अंशतः अनुदानीत, विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळा या शाळांना शाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर करणे आवश्यक असते.

यासाठी सरल प्रणालीतील विद्यार्थी प्रणाली, शाळा प्रणाली यांच्याकडे प्राप्त असलेली आवश्यक विद्यार्थी, शाळा प्रकारची माहिती इत्यादी माहितीच्या आधारे व शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेले निकष विचारात घेऊन इयता १ ली ते इयत्ता १० वी वर्ग असलेल्या शाळातील सर्व साधारणपणे ३० सप्टेंबर रोजीची विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाते व या सर्व शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर पदे शाळा निहाय मंजूर केली जातात.

प्राथमिक शाळांच्या संच मान्यता शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संच मान्यता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या लॉगीनवर उपलब्ध केल्या जातात.

संबंधीत शिक्षणाधिकारी त्यांच्या अधिनस्त शाळांना संच मान्यता वितरीत करतात. प्रशासन, व्यवस्थापन, शाळा यांना या online संच मान्यतेनुसार पुढील आवश्यक कार्यवाही करता येणार आहे.

आपणा सर्वांना संच मान्यता माहिती संकेत स्थळाचा चांगला उपयोग होईल असा विश्वास आहे.