वैद्यकीयच्या प्रवेशासाठी विशेष फेरी नोंदणीचा आज शेवटचा दिवस : २४ डिसेंबरला गुणवत्ता यादी medical entry registration 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकीयच्या प्रवेशासाठी विशेष फेरी नोंदणीचा आज शेवटचा दिवस : २४ डिसेंबरला गुणवत्ता यादी medical entry registration 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वैद्यकीय शिक्षणाच्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणीला सीईटी सेलने सुरुवात केली असून आज, सोमवारी नोंदणी आणि कॉलेजचे पर्याय निवडण्याचा शेवटचा दिवस आहे. तर २४ डिसेंबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

बीएएमएस, बीयूएमएस बीएचएमएस, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या ऑनलाइन रिक्त फेरीत काही विद्यार्थ्यांनी कॉलेज मिळूनही त्या जागांवर प्रवेश घेतले नव्हते. तसेच बीएएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी एका कॉलेजला यंदा नव्याने मान्यता मिळाली आहे. त्यातून बीएएमएस अभ्यासक्रमासाठी १०० जागा, तर बीएचएमएस अभ्यासक्रमासाठी ६० जागा नव्याने उपलब्ध झाल्या आहेत. त्या जागांचा तेथील प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही विशेष फेरी घेतली जाणार आहे.

असे असेल प्रवेशाचे वेळापत्रक

• प्रवेश फेरीसाठी २३ डिसेंबरपर्यंत कॉलेजचे पर्याय निवडता येणार.

गुणवत्ता यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार

• कागदपत्रांसह कॉलेजमध्ये जाऊन २५ डिसेंबर ते २८ डिसेंबरदरम्यान प्रवेश घेता येणार

प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असेल.

तर विद्यार्थ्यांवर कारवाई

विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांना नव्याने कॉलेजचे पर्याय निवडावे लागणार आहेत. गुणवत्ता यादीत जागा मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. तसेच जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत, त्यांच्यावर सीईटी सेलकडून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कॉलेजचे पर्याय निवडताना विद्यार्थ्यांनी त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशाच कॉलेजचे पर्याय द्यावेत, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.