ऑनलाईन संचमान्यता सन २०२४-२५ अनुषांगीक कार्यवाही करणे बाबत online sanchmanyata 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन संचमान्यता सन २०२४-२५ अनुषांगीक कार्यवाही करणे बाबत online sanchmanyata 

संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांक-एसएसएन-२०१५ (प्र.क्र. १६/१५)/टीएनटी-२, दिनांक- १५.०३.२०२४.

२. मा.शिक्षण संचालक, प्राथमिक म.रा. पुणे-१ यांचे पत्र क्र.७६२६, दिनांक ०९.१२.२०२४.

उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापन-माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजुर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजुर करणे.इ. ऑनलाईन संचमान्यतेचे सुधारीत निकष विहित करणेबाबत सुचित करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत सर्व व्यवस्थापन माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांचे सन २०२४-२५ या वर्षाचे ऑनलाईन संचमान्यतेसाठी आवश्यक असलेली मान्यता प्राप्त कार्यरत पदे, वर्ग व तुकडी निहाय विद्यार्थी संख्या, वर्ग खोली संख्या, व्यवस्थापन बदल (CHANGE MANAGMENT), POST SHIFTING इ. माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सरल डाटाबेस प्रणाली मध्ये (SCHOOL-STUDENT-SANCHMANYATA PORTAL) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

करीता आपले आधिनस्त सर्व व्यवस्थापन-माध्यमांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना दिनांक – १४.१२.२०२४ (शनिवार) रोजीपर्यंत तातडीने आपली ऑनलाईन संचमान्यता अनुषांगीक WORKING POST, EXISTING ROOMS & CLASSWISE STUDENT etc. माहिती तातडीने अद्ययावत (UPDATE & FINALIZED) करण्याच्या सुचना आपलेस्तरावरुन देण्यात याव्यात.

केंद्रप्रमुखांनी आपले CLUSTER LOGIN वरुन केंद्रांतर्गत सर्व शाळांची अचूक माहीती नोंदवीली (UPDATE & FINALIZED) जात असल्याची व्यक्तीशः खात्री करुन दैनंदीन प्रगतीचा आढावा घ्यावा. तसेच दिलेल्या विहित मुदतीत केंद्रांतर्गत सर्व शाळांची माहिती पुर्ण करुन घ्यावी. याचपद्धतीने गटशिक्षणाधिकारी यांनी उपरोक्त संपुर्ण कार्यवाहीचा केंद्रनिहाय आढावा घेऊन शिक्षणाधिकारी यांना तालुका प्रगती नियमितपणे अवगत करावी.

-: ऑनलाईन संचमान्यता सन २०२४-२५ मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख सरल लॉगीन वरुन करावयाची कार्यवाही :-

मुख्याध्यापक (HEAD MASTER) :

१) SANCHMANYATA PORTAL: सन २०२४-२५ च्या संच मान्यतेसाठी दि १.१०.२०२४ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Working Staff Teaching क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून update व Finalize पूर्ण करून त्यानंतरच Working Staff Non Teaching ची नोंद पूर्ण करावी. जर एका पेक्षा माध्यमांची (Multi Medium) शाळा असेल तर प्रथम एक माध्यम (Medium) निवडून त्या माध्यमाची कार्यरत पदे (Working Post) भरून माहिती अपडेट करावी, त्यानंतर याप्रमाणेच अन्य माध्यमाची कार्यरत पदे भरून माहिती Update करावी. सर्व माध्यमाची कार्यरत पदे भरुन Update केल्यानंतरच Finalised या बटनावर क्लिक करावे.

२) STUDENT PORTAL: मुख्याध्यापकांनी आपले STUDENT PORTAL लॉगीन मधुन SANCHMANYTA – FORWARD SANCHMANYATA (१-१२) या टॅब मधुन शाळेची वर्गनिहाय पटसंख्या (Student Catalogue Details for Sanch Manyata) पडताळुन घेऊन पुढील पडताळणीस्तव केंद्रप्रमुखांचे CLUSTER LOGIN कडे विद्यार्थी संख्या FORWARD करावी. सण २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची संच मान्यता प्रमाणित करण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. २०२४-२५ च्या संच मान्यतेसाठी HM च्या स्टुडेंट लॉगिनवर ३०/०९/२०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या पोर्टलवरील नोंद

केलेली विद्यार्थ्यांची संख्या फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती (शाळेचे माध्यम, तुकडी, अनुदान प्रकार, व विद्यार्थ्यांची संख्या) तपासून त्वरित फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी.

३) SCHOOL PORTAL मधील BASIC माहिती पडताळून झाल्यानंतर INFRA STRUCTURE BUILDING या टॅब मधील नोंदविलेल्या वर्गखोल्यांची संख्या तपासून (UPDATE & FINALIZED) करावी. नोंदविण्यात आलेल्या वर्गखोल्यांची संख्या दुरुस्ती करावयाची असल्यास केंद्रप्रमुखांकडे ऑनलाईन REJECTION REQUEST ची सुविधा उपलब्ध आहे. -: केंद्रप्रमुख (CLUSTER HEAD) >

१) SANCHMANYATA PORTAL: केंद्रांतर्गत शाळांनी दिनांक ०१.१०.२०२४ रोजीची मान्यताप्राप्त कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर पदांची संख्या अचुक नोंदविल्याची खात्री करणे. चुकीची संख्या नोंदविली असल्यास शालेय मुख्याध्यापकांचे तसे लेखी घेऊन कागदोपत्री पुराव्यानिशी WORKING POST REJECT करणे बाबतचा अहयाल गटशिक्षणाधिकारी यांचे कडे दाखल करणे. परस्पर आलेले अर्ज तालुका जिल्हास्तरावर स्विकारण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.

२) STUDENT PORTAL: शाळांकडून आलेली वर्गनिहाय पटसंख्या तपासून अंतीम करणे. चुकीची अथवा जादाचे विद्यार्थी REMOVED करण्याची सुविधा केंद्रप्रमुख यांचे लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. मात्र सदरील दुरुस्ती करतांना अथवा संचमान्यतेकरीता विद्यार्थी संख्या अंतीम करतांना केंद्रप्रमुखांनी मुळ शालेय अभिलेखे व प्रत्यक्ष उपस्थिती पडताळून घ्यावी.

३) SCHOOL PORTAL: केंद्रप्रमुखांनी त्यांचे क्षेत्रीय भेटीमध्ये निदर्शनास आल्यानुसार शाळांनी उपलब्ध वर्गखोली संख्या अचुक नोंदविली गेली असल्याची खात्री करावी. तसेच शाळांनी चुकीची नोंदविलेली वर्गखोली दुरुस्ती करावयाची ऑनलाईन REQUEST प्राप्त झाल्यास विनंती पत्र स्वीकारुन त्यास मान्यता द्यावी. व अचुक माहिती नोंदवून घ्यावी.

टिप :- केंद्रप्रमुखांनी आवश्यकता असल्यास केंद्रस्तरावर दिनांक- १४.१२.२०२४ रोजी पर्यंत “ऑनलाईन संचमान्यता माहिती नोंदणी आणि पडताळणी कॅम्प” चे आयोजन करावे. सदरील कॅम्प मध्ये शालेय मुख्याध्यापकांनी आवश्यक माहितीचे अभिलेखे घेऊन उपस्थित रहावे. जेणेकरुन केंद्रप्रमुखांना शाळांकडून अचुक माहिती नोंद करुन घेणे, तांत्रीक समस्या सोडवीणे आणि माहितीची पडताळणी करुन ती अंतीम करणे सोईस्कर होईल. -: गटशिक्षणाधिकारी (BEO):-

गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकांतर्गत सर्व केंद्र आणि शाळांचा नियमितपणे आढावा घ्यावा. प्रलंबीत शाळांची केंद्रनिहाय यादी दररोज प्रसिद्ध करावी.

शाळा माहिती दुरुस्तीचे प्रस्ताव संकलीत करुन आवश्यक कागदोपत्री पुराव्यानिशी खात्री करुन केवळ अचुक बदलाचे प्रस्ताव दिनांक- १६.१२.२०२४ (सोमवार) रोजीपर्यंत व्यावस्थापना निहाय शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्राथ-१ व प्राथ-६ शाखेकडे दाखल करावेत.

तालुकांतर्गत केंद्रस्तरीय संचमान्यता कॅम्प चे नियोजन करणे. तांत्रीक तृटीकरीता केंद्रप्रमुखंना मार्गदर्शन करणे आणि आधिनस्त सर्व व्यवस्थापन-माध्यमांच्या शाळांची विहित मुदतीमध्ये माहिती अचुक नोंदणी पुर्ण करुन घेण्याची जाबाबदारी तालुका गटशिक्षणाधिकारी यांची आहे.

कुठल्याही परिस्थितीत शाळा थेट तालुका-जिल्हा स्तरावर संपर्क करणार नाही याची खबरदारी घ्यावी.

उपरेक्त सुचना व विहित वेळेत ऑनलाईन संचमान्यता सन २०२४-२५ ची माहिती अंतीम करण्यासाठी सर्वांनी दिलेल्या जबाबदारीनुसार कार्यवाही करावी. विहित मुदतीत शाळेची संचमान्यता विषयक माहिती FORWARD न झाल्यास व पर्यायाने संचमान्यता प्रलंबीत राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी शालेय मुख्याध्यापकांची राहील याची गांभिर्याने नोंद घ्यावी.