What’s app ॲप्लीकेशन हॅक होण्याचे संकेत? असे ओळखा whatsapp हॅक झाल्याचे संकेत
WhatsApp आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, त्याच्या वाढत्या वापरामुळे हॅकिंग आणि सायबर क्राइमच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. हॅकर्स आपल्या वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात.
हॅकिंगचे काही संकेत
अज्ञात संपर्काची भरभराट : जर तुमच्या WhatsApp वर असे
काही संपर्क दिसत असतील जे तुम्ही स्वतः कधीच जोडले नाहीत, तर हे स्पष्ट संकेत आहे की तुमचे अकाउंट हॅक झाले आहे
अज्ञात व्यक्तींशी चॅटिंग :
जर तुमचे अकाउंट एखाद्या अज्ञात
व्यक्तीशी चॅट करण्यासाठी वापरले जात असेल आणि तुम्हाला त्याची कल्पना नसेल तर हे देखील हॅकिंगचे लक्षण असू शकते.
लॉग इन करण्यात समस्या :
जर तुम्ही वारंवार प्रयत्न करूनही
तुमच्या WhatsApp अकाउंटमध्ये लॉग इन करू शकत नसाल तर शक्य आहे की हॅकरने तुमच्या अकाउंटवर कब्जा घेतला आहे.
वारंवार येणारे व्हेरिफिकेशन कोड:
जर WhatsApp वारंवार
वेरिफिकेशन कोड पाठवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे एक संकेत आहे की, कोणीतरी तुमचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.
हॅकिंग टाळण्याचे उपाय
टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू करा. मजबूत पिन सेट करा.
अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका. संशयास्पद संदेशांकडे दुर्लक्ष करा.
वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा. तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवा.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे अकाउंट हॅक झाले आहे, तर लगेच WhatsApp च्या हेल्पलाइनशी संपर्क साधा.
सतर्क राहा आणि या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे छोटेसे पाऊल तुमच्या वैयक्तिक माहितीला सुरक्षित ठेवू शकते.