शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत होणार बदल्या, वेळापत्रक झाले जाहीर आता प्रतीक्षा शिक्षकांच्या रिक्त पदांची teacher online transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत होणार बदल्या, वेळापत्रक झाले जाहीर आता प्रतीक्षा शिक्षकांच्या रिक्त पदांची teacher online transfer 

शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत होणार बदल्या, वेळापत्रक झाले जाहीर आता प्रतीक्षा शिक्षकांच्या रिक्त पदांसह अवघड क्षेत्राच्या माहितीची

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक शासनाच्या ग्रामविकास विभागाने निश्चित केले असून, सन २०२३-२४चे संचमान्यतेनुसार रिक्त पदांचा व अवघड क्षेत्राचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर वेळापत्रकानुसार ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा

दिनांक 18 जून 2024 सुधारित बदली धोरणाचा शासन निर्णय

शिक्षक भदली संवर्ग एक दोन तीन चार अटी व पात्रता

दिनांक 21 जून 2023 नवनित शिक्षकांसाठी बदली धोरण

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे धोरण शासन निर्णय दि. १८ जून २०२४ रोजी नुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात आहे.

तसेच जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारण संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची

पूर्वतयारी करण्याची कार्यवाही जिल्ह्यातील अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर आदी पंचायत समित्याअंतर्गत येणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी दिले आहेत.

असे आहे वेळापत्रक

शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे (बदली पात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक आदी) त्याअनुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे-१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी, समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी, उपलब्ध रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करणे- १ मार्च ते ३१ मार्च, बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सीस कंपनीस उपलब्ध करून देणे- १ एप्रिल ते २० एप्रिल, विशेष संवर्ग शिवाक भाग-१ व भाग २ शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, त्यांच्या बदल्या करणे- २१ एप्रिल ते ९ मे, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे-१० ते १५ मे, बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास त्यांच्या बदल्या करणे- १६ मे ते २१ मे, विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे २२ ते २७ मे आणि अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे २८ ते ३१ मेपर्यंत

सर्व पंचायत समितीअंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी वेळापत्रक तपासून घ्यावे, जिल्हांतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियामध्ये शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्यास, शिस्तभंगाची कारवाई होईल. त्यामुळे संचमान्यतेनुसार रिक्त पदांचा माहे नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा अहवाल व अवघड क्षेत्राबाबत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

– रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक