सन २०२४-२५ ची संचमान्यता दुरुस्त करणेबाबत sanchmanyata shasan nirnay 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ ची संचमान्यता दुरुस्त करणेबाबत sanchmanyata shasan nirnay 

संदर्भ : शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५ (प्र.क्र. १६/१५)/ टीएनटी-२, दिनांक २५.०३.२०२४

संचमान्यता दुरुस्तीबाबत परिपत्रक येथे पहा

उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्रार्थामक, उच्च प्राथमिक व माध्यमिक, शाळांतील विद्याथ्यांच्या पटसंख्येच्या अधारावर शिक्षक पदे मंजुर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजुर करणे इ. संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

२/- तरी, आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, इ. सर्व) सन २०२४-२५ च्या संचमान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सबच, आपल्या अधिनस्त सर्व (स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन इ. सर्व) यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावे.

संचमान्यतेची सुधारित निकष दिनांक 15 मार्च 2024 चा शासन निर्णय येथे पहा

संचमान्यता बाबत दिनांक 11 ऑक्टोबर 2024 चे शासन निर्णय येथे पहा

१. शिक्षक/शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरीता बकींग पोस्ट (मान्यता प्राप्त कार्यरत पदे) भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.

२. चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन (चेंज मॅनजेमेंट) आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करुन पोस्ट

शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

३. शिफ्टींग ऑफ पोस्ट. (आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी.)

४. उच्च माध्यमिक अँड पोस्ट करणे.

५. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग खोल्याची अचूक माहिती भरणे.

६. मुख्याध्यापक यांनी ३० सप्टेंबर २०२४ चे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करुन संचमान्यतेकरीता तपासून फॉरवर्ड करायो व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्याधर्थी संख्या व्हेरीफाय करुन संचमान्यतेकरीता फॉरवर्ड करावे

तरी, प्रणालीवर उक्त कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. व तसे या कार्यालयास अवगत करण्यात यावे.