सन 2024-25 या वर्षात गणित विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नियोजन सरळ फेरी जलद फेरी बझर फेरी दृश्य फेरी prashnamanhusha feri 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2024-25 या वर्षात गणित विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नियोजन सरळ फेरी जलद फेरी बझर फेरी दृश्य फेरी prashnamanhusha feri 

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय गुणवत्ता वाढविण्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी देखील प्राथमिक स्तरावरून व्हावी या शालेय उद्देशाने अभ्यासकमावर 25%, सामान्य ज्ञानावर 50%, भारतीय संविधानावर 25% (संविधान- मुलभूत अधिकारी व जबाबदा-या) या विषयावर प्रश्नमंजुषा खालील दिलेल्या नियोजना नुसार घेण्यात येणार आहे. सदर स्पर्धा मराठी व उर्दू या दोन्ही माध्यमासाठी घेण्यात येणार आहेत.

 

1) सरळ फेरी (2) जलद फेरी 3) बार फेरी 4) दृष्य फेरी

गुणदान करत असतांना पंचानी घेतलेला निर्णय हा अंतिम व सर्व संघाना मान्य राहील.

फेरी

क्र.

फेरीचे

नाव

विचारले जाणारे

एकूण प्रश्न

फेरीचे

विषय

एकूण गुण
1सरळ फेरीप्रत्येक संघास वर्ग निहाय अभ्यासकमावर आधारित 1) भाषा (मराठी ऊर्दू, इंग्रजी) 2) गणित 3) विज्ञान 4) इति. नाग 5) भुगोल या विषयांचे प्रती विषय दोन प्रश्न विचारण्यात येतील. असे एकूण संघास या फेरीत 10 प्रश्न विचारण्यात येतोलप्रत्येक संधास प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास 30 सेकंदाचा वेळ देण्यात येईल 30 सेकंदानंतर देण्यात आलेले उत्तर ग्राहय धरण्यात येणार नाही. एका संघास विचारण्यात आलेला प्रश्न दुस-या संघास पास करता येणार नाही.या फेरीत प्रत्येक अचूक उत्तरास (05) गुण देण्यातं येतील चुकीच्या उत्तरामूळे गुण बजा होणार नाहीत. (निगेटीव्ह माकींग नाही.)
     
2जलद फेरीया फेरीत प्रत्येक संघास सामान्य ज्ञानावर आधारीत 5 व संविधानावर 5 प्रश्न विचारण्यात येतील हे सर्व प्रश्न एका मिनिटात जलद गतीने विचारण्यात येतील व या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी केवळ 1. मिनिटांचा अवधी देण्यात येईलप्रत्येक संघास 10 प्रश्न जलद गतीने एका नंतर एक असे विचारण्यात येतील या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संघातील एक विद्यार्थी प्रतिनिधीक स्वरूपात उतरे देण्यासाठी संघातील इतर विद्यार्थ्यांचे मत घेऊ शकेल पण अंतिम उत्तर हे त्याचेच ग्राहय असेल एखा‌द्या प्रश्नांचे उत्तर येत नसल्यास त्याने त्यावर जास्त विचार न करता पास म्हणावे म्हणजे त्यास दुसरा प्रश्न लगेच विचारण्यात येईल.या फेरीत प्रत्येक अचूक उत्तरास (05) गुण देण्यात येतील. चुकीच्या उत्तरामुळे गुण बजा होणार नाहीत. (निगेटीव्ह माकौंग नाही.)
     
3

बझर

फेरी

या फेरीत सर्व संघास एकत्रित स्वरूपात फेरी क्र.। मधील अभ्यासक्रमातील विषय नुसार सामान्य ज्ञानावर आधारित प्रती विषय एक नुसार 5 प्रश्न असावीत तसेच संविधानावर 5 असे सर्व संघास एकत्रित स्वरूपात 10 प्रश्न विचारण्यात येतील,या फेरीत जो संघ प्रश्न ऐकल्यानंतर सर्वात अगोदर बझर दाबेल त्या संघास उत्तर देण्याची संधी देण्यात येईल. त्या संघाचे उत्तर बरोबर आल्यास त्यास गुण देण्यात येईल. पण जर उत्तर चुकीचे देण्यात आल्यास गुण बजा करण्यात येतील व तो प्रश्न इतर संघास विचारण्यात येणार नाही.या फेरीत प्रत्येक अचुक उत्तरास (05) गुण देण्यात येतील. चुकीच्या उत्तरामुळे (-3) गुण वजा केल्या जाईल. (निगेटीव्ह माकौग असेल)
     
4दृश्य फेरीया फेरीत सर्व संघास एकत्रित स्वरूपात सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न पडद्यावर / कागदावर दृष्य स्वरुपात विचारण्यात येतील, यात चालुघडामोडी, राजकीय, क्रिडा, साहित्य, वैज्ञानिक या विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात येतील, सर्व संघाना एकत्रित स्वरुपात 10 प्रश्न विचारण्यात येतील.या फेरीत जो संघ प्रश्न ऐकल्या नंतर सर्वात अगोदर बड़झर दाबेल त्या संघास उत्तर देण्याची संधी देण्यात येईल, त्या संघाचे उत्तर बरोबर आल्यास त्यास गुण देण्यात येईल, पण जर उत्तर चुकीचे देण्यात आल्यास गुण वजा करण्यात येतील. व तो प्रश्न इतर संघास विचारण्यात येणार नाही.या फेरीत प्रत्येक अचुक उत्तरस (05) गुण देण्यात येतील. चुकीच्या उत्तरामुळे (-3) गुण बजा केल्या जाईल (निगेटीव्ह माकींग असेल)
     
     

As

उपरोक्त प्रश्नमंजुषा स्पर्धा शालेय, केंद्र, बीट, तालुका व जिल्हा स्तरावर घ्यावयाच्या 1 ली ते 5 वी व 6 वी ते 8 वी या दोन गट निश्चित झाले आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्रती शाळा एक गट, प्रती गट 3 विद्यार्थी । ली ते 5 वी (तीन विद्यार्थी) 6 वी ते 8 वी या (3) विद्यार्थी) शाळास्तरावर, केंद्र स्तरावर प्रथम आलेल्या शाळेचांच गट हा बीट स्तरावर राहील. बीट स्तरावर प्रथम आलेल्या शाळेचाच गट हा तालुका स्तरावर सहभाग घेईल व तालुकास्तरावर प्रथम आलेला। ली ते 5 वी व 6 वी ते 8 वी चा गट जिल्हा स्तरावर सहभाग घेतील.

सदर शाळास्तरावरील स्पर्धा दिलेल्या दिनांकास एकाच दिवशी सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतुन घेणे अपेक्षित आहे. सोबत दिलेल्या गुणदान व फेरी मधील नियोजन नुसार प्रत्येक फेरी घेण्यात यावी. सर्व विद्यार्थ्यांचा सराव चांगल्या प्रकारे होईल. यासाठी तालुका पातळीवर प्रथम आलेल्या शाळेसच जिल्हास्तरावर पाठविण्यात यावे. सदर स्पर्धा चार फे-यामध्ये घेण्यात येणार आहे. 1) सरळ फेरी (2) जलद फेरी 3) बार फेरी 4) दृष्य फेरी

गुणदान करत असतांना पंचानी घेतलेला निर्णय हा अंतिम व सर्व संघाना मान्य राहील.