१० किंवा १० पटापेक्षा कमी शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज स्विकारणेची प्रक्रिया स्थगित kantrati shikshak bharti
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय दि. २३, सप्टेंबर २०२४ नुसार, डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती बाबत दिनांक १०/१२/२०२४ अखेर प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली येथे अर्ज करावयाचे होते.
कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती रद्द
सद्यस्थितीत, दि.०५/१२/२०२४ रोजी मा. शिक्षण संचालक (प्राथ), शिक्षण संचालनालय, पुणे यांचे व्हिसी मधील सूचनेनुसार १० पटापेक्षा कमी शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज स्विकारणेची प्रक्रिया बंद करणेत आली आहे. याबाबत शासन स्तरावरून आदेश प्राप्त झालेनंतर पुढील कार्यवाही करणेत येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कर्मचाऱ्यांचा तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अदा करणे बाबत
वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीनेच
शैक्षणिक वर्ष 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर