१० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील कार्यरत शिक्षकांचे बदलीबाबत kami patsankhya shala letter
संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील, शासन निर्णय क्र संकीर्ण २०२४/ प्रक्र ६६६/टिएनटि-१, दि २३/०९/२०२४.
उपरोक्त विषयानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत वरील संदर्भिय शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार या कार्यालयाकडे दि. १०/१२/२०२४ अखेर अर्ज स्विकारणेची कार्यवाही सुरू असून, प्राप्त अर्जामधील पात्र उमेदवारांना नियुक्ती देणेची कार्यवाही यथावकाश पूर्ण होईल.
यास्तव, संदर्भिय शासन निर्णयातील मागर्दर्शक सूचनांनुसार, १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर एक वरील प्रमाणे कंत्राटी नियुक्ती करणेची असलेने, सदर शाळेवरील एक पद रिक्त असने आवश्यक आहे, यास्तव सदर शाळेवरी एका शिक्षकाची बदली खालील तरतुदीनुसार करणे अनिवार्य आहे :-
१) कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका इच्छूक शिक्षकाची बदली करणे २) दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छूक असतील तर सेवाजेष्ठ शिक्षकाची
प्राधान्याने बदली करणे.
३) दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छूक नसतील तर सेवा कनिष्ठ शिक्षकाची
प्राधान्याने बदली करणे.
वरील प्रक्रीयेस्तव, संचमान्यता सन २०२३-२४ नुसार १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची व सदर शाळेवर कार्यरत शिक्षकांची यादी या पत्रासोबत विहीत नमुना अ मध्ये जोडलेली आहे.
सबब, सदर बाबत आपणास सूचित करणेत येते की, सदर शाळा व शाळासंबंधित माहिती मध्ये कोणताही बदल करू नये. परंतू शाळेवरील कार्यरत शिक्षकांची माहिती तपासून, आवश्यक ते बदल करून विहीत नमुन्यातील माहिती या कार्यालयास दि.२९/११/२०२४ अखेर सादर करावी. सदर
माहितीसाठी संबंधित शिक्षकांकडून घ्यावयाचा विकल्पाचा नमूना या पत्रासोबत जोडणेत आलेला आहे.