जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी चर्चासत्राचे आयोजन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांना उपस्थित राहण्याबाबत teacher online transfer
शिक्षक संघटना अध्यक्ष किंवा सचिव यांची चर्चासत्र दिनांक 26.11.2024 बाबत.
संदर्भ : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचना.
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षक संघटना अध्यक्ष किंवा सचिव यांच्या सोबत जिल्हा अंतर्गत बदल्या व इतर विषयी चर्चा करणार आहेत. करिता आपण तालुक्यातील शिक्षक संघटना अध्यक्ष किंवा सचिव (दोन्ही पैकी एक) यांना सदरील चर्चासत्रास दिनांक 26.11.2024 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे उपस्थित होण्याच्या सूचना द्यावे.