विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मतदार नोंदवही मध्ये अचुक नोंदी न घेतल्याबाबत vidhansabha election nondvahi
या नोटीसद्वारे आपणास कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 118 चांदवड विधानसभा मतदार संघात आपली नेमणूक मतदार केंद्र क्रमांक 276 कातरवाडी या मतदार केंद्रावर मतदान अधिकारी पथकात नियुक्ती करण्यात आली होती. दिनांक 20/11/2024 रोजी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान केंद्रावरील कामाच्या आधारे काही मतदान केंद्राची कागदपत्र छाननी मा. निवडणूक निरीक्षक श्रीमती. इफत आरा यांच्या उपस्थितीत दिनांक 21/11/2024 रोजी करण्यात आली होती. त्या छाननी मध्ये मतदान केंद्र क्र. 276 घेण्यात आले असता आपण मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी नमुना 17 C, तसेच PS05 मध्ये मतदान केंद्र क्रमांक 276 असतांना आपण मतदान केंद्राचा क्रमांक 306 असा नमूद केला आहे. तसेच नमुना 17अ मतदारांची नोंदवही मध्ये मतदार माहिती पत्रक (VIS) हा आयोगाच्या यादीतील ओळीखीचा ग्राह्य पुरावा नसतांना देखील आपण मतदार माहिती पत्रक (VIS) नमुद केलेले आहे. त्या आधारे मतदान करू दिले आहे. ही अतीश्य गंभीर बाब आहे. तसेच मतदार ओळखपत्र (EPIC) न वापरता नमुद केलेले मतदान याचा ताळमेळ होत नाही. सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून आपणाविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनिमय 1951 चे कलम 134 नुसार कारवाई का करण्यात येवू नये? याबाबतचा लेखी खुलासा नोटीस मिळताक्षणी माझे समक्ष सादर करवा अन्यथा आपले काहीएक म्हणणे नाही असे समजून पुढील कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
सदरची नोटीस आज दिनांक 26/11/2024 रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिली असे.