सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ मुदतवाढ देण्याबाबत 7th pay commission committee
सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ मुदतवाढ देण्याबाबत….
वाचा :- १. शासन निर्णय क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि.१६.०३.२०२४ २. शासन निर्णय क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि.११.०९.२०२४
प्रस्तावना :-
सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्याकरिता वरील क्र.१ येथील आदेशान्वये वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे.
हे ही वाचा
जुनी पेन्शन बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय
अपार दिवस साजरा करण्याबाबत शासन निर्णय
NAS परीक्षा सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत प्रश्नपेढी उपलब्ध
52 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक
सातव्या वेतन आयोगातील त्रुटी निवारणासाठी मुदतवाढ
ब्लेंडेड मोड कोर्स साठी मदतवाढ परिपत्रक
सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी वरील क्र.२ येथील शासन निर्णयान्वये दि.३१ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तथापि, समितीस अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४११२६१६१२२९२१०५ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.