या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old pension scheme for state government servant 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old pension scheme for state government servant 

दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात/ अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रूजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत

वाचा :-१) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.४६/सेवा-४/दि.०२.०२.२०२४

२) केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभागाचे पत्र क्र.५७/०५/२०२१-पी व पीडब्ल्यू (बी), ०३/०३/२०२३

३) फ़्ला.ले.धनंजय यशोधन सदाफळ (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा यांचे क्र. ११०६/आस्था/जिसैकका-१ दि.२२/०५/२०२४

रोजीचे पत्र

४) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१८/सेवा-४, दि.०२/०५/२०२४

प्रस्तावना :-

केंद्र शासनाच्या अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त

जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात / भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि.२२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दि.०१.०१.२००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२/२०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भाधीन क्र.२ येथील कार्यालयीन ज्ञापनाव्दारे निर्णय घेण्यात आला आहे.

२. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी/कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) वित्त विभागाच्या दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे.

३. या निर्णयाच्या अनुषंगाने, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील फ्ला.ले. धनंजय यशोधन सदाफळ, (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा, सामान्य राज्यसेवा गट-अ यांचा दि.२२.०५.२०२४ रोजीचा अर्ज/विकल्प शासनास प्राप्त झालेला आहे.

४. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्र.२२४७/६२२३/दहा, दि.२१.०७.२००५ रोजीच्या पत्रान्वये फ्ला. ले. धनंजय यशोधन सदाफळ, (सेवानिवृत्त) यांची जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सामान्य राज्यसेवा गट-अ पदावर नियुक्तीबाबत शिफारस करण्यात आली आहे. त्यानुषंगाने फ्ला. ले. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सामान्य राज्यसेवा गट-अ यांची दि.१४.१०.२००५ रोजीच्या शासन निर्णयानुसार नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.धनंजय य. सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे दि.३०/०६/२०२४ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. सबब, फ्ला. ले. धनंजय यशोधन सदाफळ, (सेवानिवृत्त्ा) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा (सेवानिवृत्त) यांना वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ मधील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत

👉👉जुनी पेन्शन बाबत शासन निर्णय येथे पहा click here 

पुढीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेत:-

शासन आदेश :-

सामान्य प्रशासन विभागांतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, या संवर्गात असलेले

अधिकारी फ्ला. ले. धनंजय यशोधन सदाफळ, (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा यांना वित्त विभागाच्या दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यात येत आहेत.

२. फ्ला. ले. धनंजय यशोधन सदाफळ, (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे.

3. वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ नुसार, फ्ला. ले. धनंजय यशोधन सदाफळ, (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्यनिर्वाह निधी (GPF) खाते तात्काळ उघडण्यात यावे. तसेच, सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) मधील खाते बंद करून, त्यातील कर्मचाऱ्याच्या हिश्याची रक्कम देय / अनुज्ञेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा करावी.

४. तसेच, फ्ला. ले. धनंजय यशोधन सदाफळ, (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, (सेवानिवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन (NPS) खात्यातील राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम देय / अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी.

2/3

पृष्ठ ३

शासन आदेश क्रमांकः सैकवि-२०२१/प्र.क्र.३३

५. याकरिता संदर्भ क्र.३ येथील दि.०२/०५/२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी. सदर कार्यवाहीकरिता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४११२६१५४८१४४५०७ असा आहे. सदर शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.