अपार कार्ड! शाळांमधून विद्यार्थ्यांना दिले जाताहेत अर्ज, नोंदणीची प्रक्रिया सुरू apaar id registration application
जिल्ह्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आता
शाळांमधून विद्यार्थ्यांना दिले जाताहेत अर्ज, नोंदणीची प्रक्रिया सुरू
अपार अर्ज व नोंदणीची प्रक्रिया सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी’ (अपार कार्ड) दिला जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील तीन लाख
विद्यार्थ्यांना या ‘अपार कार्ड’च्या माध्यमातून नवी ओळख मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची संपूर्ण माहिती या ओळखपत्रात असणार आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांना अर्ज दिले जात आहेत. ‘अपार कार्ड’ ही विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख देणारी प्रणाली आहे. त्यामध्ये या विद्यार्थ्यांना बारा अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे.
संबंधित क्रमांक त्या विद्यार्थ्यांची ओळख असणार आहे. या क्रमांकावर असलेल्या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक
नोंदीचा समावेश असेल. शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये या कार्डसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांनी संमती दिल्यानंतरच ‘अपार कार्ड’
बनवण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्वच व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांना नोंदणीचे काम दिले आहे.
काय आहे ‘अपार’?
‘अपार कार्ड’ प्रणाली ही एज्युलॉकरसारखी असणार आहे. त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध असणार आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, पत्ता, त्याची शाळा, महाविद्यालय, इयत्ता, त्याचा निकाल, त्याला मिळालेले पुरस्कार, शिष्यवृत्ती आदी माहिती उपलब्ध असणार आहे. ही माहिती त्याला डिजिटल स्वरूपात संग्रहित करून ठेवता येणार असून, ती अद्ययावत करता येणार आहे. ‘क्यूआर कोड’ ही दिला जाणार आहे.
‘अपार कार्ड’चा फायदा काय?
विद्यार्थ्यांना हे कार्ड अधिक उपयुक्त ठरणार आहे. ते आधारकार्डशी जोडले जाणार आहे. तसेच त्यामध्ये पालकांच्या आधार क्रमांकाचाही समावेश करण्यात आला आहे. या कार्डमुळे विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी शासनाला विविध शैक्षणिक योजना राबविणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
नोकरीसाठीही कागदपत्रे देण्याची गरज नाही अपार कार्ड’चा क्रमांक टाकल्यानंतर सर्व माहिती समोर येते. त्यामुळे ‘
नोकरीसाठी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. संबंधित कंपनी किंवा संस्था फक्त या कार्डच्या क्रमांकावरून उमेदवाराचा सर्व शैक्षणिक प्रवास जाणून घेईल.